मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संवादयात्राचे प्रकाशन

"संवादयात्रा" उपक्रम स्तुत्य
नागपूर/प्रतिनिधी:

विश्वास पाठक लिखित, 'संवादयात्रा ' या ऊर्जा विभागाच्या ४ वर्षांतील लोकाभिमुख कार्याच्या प्रसारासाठीचा महाराष्ट्रातील एक राज्यव्यापी उपक्रमाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे , माराविम सुत्रधारी कंपनीचे संचालक व लेखक विश्वास पाठक, ऊर्जाविभागाचे उपसचिव बी. वाय. मंता व ऊर्जामंत्र्यांचे माध्यम सल्लागार विवेक जोशी उपस्थित होते.

सुमारे १२,००० किमीच्या राज्यव्यापी झंझावती दौऱ्यात मरावीम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ३५ पत्रकार परिषदा घेऊन ६ कोटी वाचकांपर्यंत ४ वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या कामगिरीचा आलेख पोहचवला. यावेळी १००० पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

अवघ्या महिनाभराच्या संवादयात्रेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ऊर्जेशी निगडीत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. लोकाभिमुख योजनांची माहिती पत्रकारांना दिली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वेगवाग कार्यशैलीचे कौतुकही केले. त्यांच्या या राज्यव्यापी दौऱ्याची दखल ४०० हून अधिक दैनिकांनी तसेच टीवी पत्रकारांनीही घेतली.

या संपूर्ण प्रवासात आलेले वास्तववादी अनुभव या पुस्तकातून वाचकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न विश्वास पाठक यांनी केला आहे. एक स्तुत्य उपक्रम म्हणून मुख्यमंत्र्यांनी या पुस्तकाचे व उपक्रमाचे कौतुक केले.