वीज केंद्र,वसाहत आणि कर्मचारी हे त्रिकोणीय नाते अधिक मजबूत व्हावे:चंद्रकांत थोटवे

खापरखेडा वीज केंद्राच्या २९ व्या वर्धापन दिनाचा शानदार समारोप
२७२ पिशव्या रक्तदानाने जोपासली सामाजिक बांधिलकी

गृहिणींच्या पाककलेचा आनंद मेळावा
क्रीडा-कला स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान

 एव्हेंजर गुणवत्ता मंडळाची जपान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 १० वर्षीय इशांत भूषण चवरे या आंतरराष्ट्रीय जलतरणपटूचा सत्कार
 
खापरखेडा/प्रतिनिधी:

वीज केंद्र, वसाहत आणि कर्मचारी यांच्या नात्यांची घट्ट वीण खापरखेडा वीज केंद्रात बघायला मिळते या नात्याला अधिक दृढतेने सांभाळायला हवे कारण वर्धापन दिन हा खऱ्या अर्थाने नाते सांभाळण्याचा दिवस असल्याचे मत महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी व्यक्त केले. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या २९ व्या वर्धापन दिनाच्या समारोपीय समारंभात ते क्लब नंबर एक येथे बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत थोटवे, प्रमुख पाहुणे कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, कैलाश चिरूटकर, विशेष अतिथी मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, दिलीप धकाते, उप मुख्य अभियंते सुनील सोनपेठकर, राजेंद्र राऊत, प्रदीप फुलझेले, मनोहर खांडेकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून, महानिर्मितीच्या राज्यभरातील औष्णिक विद्युत केंद्रात अतिशय नियोजन पूर्व भांडवली खर्च, देखभाल दुरुस्तीची तसेच इतर तांत्रिक स्वरूपाच्या कामांवर मेहनत घेतल्याने वीज संचांच्या कार्यक्षमतेत आमुलाग्र वाढ झाली आहे व पर्यायाने मनुष्यबळाच्या समाधानाचा स्तर उंचावला असल्याचे गौरवोद्गार कैलाश चिरूटकर यांनी काढले.
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी-अभियंते-कर्मचारी हे ऊर्जा निर्मितीसोबतच सामाजिक दायीत्वाची भूमिका चोख बजावत असल्याचे मत विनोद बोंदरे यांनी व्यक्त केले. 
महानिर्मितीच्या तरुण मनुष्यबळाने वित्तीय व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील मनुष्यबळाने उर्वरित जीवनाचे नियोजन करण्याचा सल्ला चंद्रकांत थोटवे यांनी दिला. 

प्रारंभी मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा वार्षिक आढावा अभिनव पद्धतीसह डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आला. विवेक चनेकर व विजय अढाऊ यांनी चित्रफितीसाठी विशेष मेहनत घेतली. प्रास्ताविकातून मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी संचालक पाच सूत्री कार्यक्रम अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचला असल्याचे सांगितले व मागील वर्षभरातील उपक्रम, बाग-बगीचे, पाणी बचत, पुनर्वापर, कल्पकता, परिसरातील उल्लेखनीय कामांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. २७२ पिशव्या रक्तदान करून खापरखेडा वीज केंद्राने सामाजिक जाणीवेचा परिचय दिला. 
खापरखेडा महाचर्चा विशेष भाग आरोप-प्रत्यारोप अभिरूप नाटिकेतून सादर करण्यात आला. त्यामध्ये संचालक पाच सूत्री कार्यक्रमाची विशेषता उपस्थितांसमोर मांडण्यात आली. कलाकारांच्या प्रतिभेला उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला.यामधील कलावंत भास्कर शेगोकार,दयानंद कोकाटे,आशिष काळे,रमेश पिंपळकर, प्रसाद चौधरी, तेजस साळवी, महेंद्र राऊत, आशिष नाचणे, क्षितिजा घाटगे, तांत्रिक सहाय- श्याम चांदुरकर,संकेत येलगावकर, उमेश ढेपे आदींचे सहकार्य लाभले. 

मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे पारीतोषिक वितरण करण्यात आले. ज्यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन,व्हॉलीबॉल,बुद्धिबळ, फन गेम, टेबल टेनिस, कॅरम, ब्रिज, हाउस कीपिंग, रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन, आनंद मेळावा, रस्साखेच, जीवन सुरक्षा विषयक व्याख्यान व प्रात्याक्षिके इत्यादी भरगच्च कार्यक्रम वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आले व प्रकाशनगर वसाहतीतील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. समारोपीय समारंभाचे बहारदार सूत्र संचालन पल्लवी शिरसाठ व विशाल बनसोडे यांनी केले.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, शरद भगत, भारत भगत, जितेंद्र टेंभरे,सुनील रामटेके, परमानंद रंगारी, अर्जुन वानखेडे, डॉ.मिलिंद भगत, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम तसेच वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंते-कर्मचारी, विविध संघटना प्रतिनिधी, वर्धापन दिन आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य, प्रकाशनगर वसाहतवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.