नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी गणेश आसोरे

विनोद खंडारे (नांदुरा):
नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार श्री गणेश आसोरे, उपाध्यक्ष पदी एकनाथ अवचार सर, सचिव पदी विनोद खंडारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

साथनिक विश्राम गृह येथे माजी अध्यक्ष श्री किशोर खैरे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी गणेश आसोरे यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पदी एकनाथ अवचार सर, सचिव पदी विनोद खंडारे तर कोषाध्यक्ष पदी गजानन पंचभाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 
या प्रसंगी पत्रकार संघाचे सदस्य जगदीश आगरकर, भगवान बावणे, गणेश खंडारे, सुहास वाघमारे, सुरेश पेठकर, सेवक राजपाल, तुकाराम रोकड़े, पुरुषोत्तम भातुरकर, विठ्ठल भातुरकर, कलीम परवेज खान, राजेश राऊत, देविदास मानकर, विवेक पाउलझगडे, रवींद्र होनालेेे,देवेन्द्र जैस्वाल, बाळू चोपडे उपस्थित होते.