शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीच्या जागेवरील अतिक्रमण हटवा

भंडारा/प्रतीनिधी:

 तुमसर शहरातील श्रीराम टॉकीजच्या अमोर- समोर असलेली आरक्षित जागा अनेक वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. परंतु प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले असुन महाराजांच्या आरक्षित जागेवर संबंधित अधिकाऱ्यांकडून आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे. या विषयाचा निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले. सदर आरक्षित जागेचा भूमापन क्रमांक व ७/१२ देण्यात यावे, तसेच या जागेवरील अतिक्रमण हटवून डी. एल. आर व चतुर्थसिमा, मोजमाप सहित उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे. 

जेणेकरून अनेक वर्षांपासून रखडलेला स्मारकाच्या विषय योग्य मार्गी लावण्यास सोईचे होईल व तुमसर शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारक तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल. करिता त्वरित योग्य कार्यवाही करावी. 

या विषयाचा पत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. संजयजी राठोड साहेब, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, भूमिअभिलेख अधिकारी सुखदेव खोडे, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अर्चना मेंढे तथा तुमसर शहराचे नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांना या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, युवासेना तालुका अधिकारी संजू डाहाके, प्रवीण गायधने, शहर प्रमुख प्रवीण गुप्ता सह शिवसैनिक उपस्थित होते.