चंद्रपूरच्या त्या दुहेरी हत्या प्रकरणात दोघांना अटक

ललित लांजेवार:

चंद्रपुरात खळबळ उडवून देणाऱ्या रमाबाई नगरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात रामनगर पोलिसांनी एक अल्पवयीन युवकासह आसिफ शेख याला अटक केली आहे.या प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.चंद्रपूरच्या रमाबाई नगर येथे बुधवारी रात्री जुन्या बादातून गुड्डू साव आणि सोनू साव या भावंडांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात बापू पेंदाम याला पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली होती.

 तर शनिवारी रात्रीच्या सुमारास आसिफ शेख व अन्य एक अल्पवयीन युवकाला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार कोळी करीत आहेत.