बंदिस्त इतिहास समजण्यासाठी मोडी लिपि शिका


  • मोडीलिपि अभ्यासक नविनकुमार माळी यांनी दिले धडे 


नागपूर - प्रतिनिधी
कला, साहित्य, भाषा यांचा अभ्यास तर केला पाहिजेच परंतु खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मोडी लिपिशिवाय आज कुठलाही पर्याय नाही. महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाचा वारसा संपन्न आहे. आपल्या संस्कृतीची मर्मस्थाने मोडी लिपीमध्येच आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व व्यवहार व कागदपत्रे सर्व मोडी लिपिमध्ये बंदिस्त आहे. त्यामुळे मोडी लिपीचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मोडीलिपि अभ्यासक नविनकुमार माळी यानी केले.
मोडी लिपीमध्ये या देशात खरा इतिहास आहे, तो वाचता यावा व आजच्या पिढीला सत्य कळावे यासाठी जागतिक मोडी लिपि समिती व डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७/१/२०१९ रोजी रविवारला एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी, प्राध्यापक,व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मोडीलिपि अभ्यासक नविनकुमार माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मोडी लिपि अभ्यासक भुपेश पाटील होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात नविनकुमार माळी म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास हा मोडी लिपिमध्ये आहे. आज इतिहासकारांमद्धे विविध मतप्रवाह आहेत परंतु मोडी लिपीचे अध्ययन करून घेतले तर खरा इतिहास आपल्याला कळेल. आज जगतिकीकरणाचे युग आहे. यावेळी सहभागी प्रशिक्षार्थी व विद्यार्थ्यांना अवघ्या 3 तासात मोडीलिपीची मुळाक्षरे शिकविली.
भुपेश पाटील म्हणाले, खरा आणि जीवंत इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तत्कालीन लिपिसारखा जवळचा मित्र दूसरा कोणीही नाही मोडी लिपि असो की धम्म लिपि या बाबतची जागरूकता वाढली पाहिजे. जुने दिवाणी मामले, जात पडताळणीचे प्रकरणे यासाठी न्यायलयीन प्रक्रियेत सुद्धा मोडी लिपीचा अत्यंत महत्वाची भूमिका आहे. मोडी लिपि अवगत नसल्यामुळे इतिहास कसं चुकीचा लिहिला गेला तसेच न्यायलयीन प्रक्रियेत कसे अडथळे आलेत याची विविध उदाहरणे दिली. देशाची संस्कृती जाणून घेण्यासाठी मोडी लिपिशिवाय दूसरा मार्ग नाही असे ते याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना मराठी विभाग प्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे म्हणाले, मोडी लिपि आणि धम्म लिपीतच या देशाची खरी संस्कृती आहे. अशोकाचे शिलालेख वाचता यावे यासाठी धम्म लिपि अतिशय महत्वाची असल्याचे यांनी संगितले. मोडी लिपि व धम्म लिपि आपल्या संस्कृतीची तसेच इतिहासाची खरी भाषा असून तीच आपल्या ज्ञानसंवर्धंनासाठी महत्वाची आहे. सरकारने पुढाकार घेऊन या लिपीचे तसेच जुन्या दस्तयेवाजाचे सरक्षण करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी केले. संचालन प्रा. वैशाली धनविजय यांनी तर आभार अंकित मालखेडे यांनी केले. या कार्यशाळेसाठी पवन कनोजे, सौरभ मेश्राम, धनंजय निखाडे, हिलोरी भांगे, अश्विनि शिंदे, काजल पडोळे, स्वप्नील पाटील, प्रफुल गवई यांनी परिश्रम घेतले.या कार्यशाळेला बरेच जाणकार नागरिक, प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.