बल्लारपूरचे उपाध्यक्ष व सभापती यांचे पदग्रहण

बल्लारपूर /अमोल जगताप:

 बुधवारी नगर परिषद बल्लारपूर येथे नवनिर्वाचित नगर परिषद बल्लारपूर चे उपाध्यक्ष व सभापती यांचे पदग्रहण चे कार्यक्रम पार पडले. यावेळी मा. ना. चंदनसिंह चंदेल, अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा), वनविकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य व मा. श्री. हरीश शर्मा, नगराध्यक्ष, बल्लारपूर तथा जिल्हाध्यक्ष, भाजपा, चंद्रपूर(ग्रा.) यांनी नवनिर्वाचित नगर परिषद बल्लारपूर चे उपाध्यक्ष व सभापतींचे सत्कार करत, जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या ची जाणीव करून, त्या जाणीव पूर्वक निराकार करत सुशासन करण्या बाबत सूचना करत, शुभेच्छा दिल्या.
आज नगर परिषद, बल्लारपूर च्या उपाध्यक्षा म्हणून, मा. सौ. मीना चौधरी, यांनी पद ग्रहण केले. तसेच महिला व बालकल्याण समिती च्या उपसभापती पद - सौ. साखर बेगम नबी अहमद, सौ. पुनम कार्तिक निरांजने यांनी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती,श्री नरसय्या येनगंदलावर, पाणीपुरवठा आणि जल निस्तार समितीचे सभापती, श्री स्वामी रायबरम, यांनी स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती, म्हणून यांनी पद ग्रहण केले.