हळदीकुंकू महिला सक्षमीकरणाचा महोत्सव:खुशाल बोंडे

गोवरी /प्रतिनिधी:

माता, भगिनींचा सन्मान, त्यांच्या सौभाग्याचे रक्षण, मातृशक्तीचा जागर आणि वैचारीक देवाणघेवानीला चालना मिळावी या उद्देशाने भाजपा महिला आघाडीच्या वतीने मकरसंक्रांतीच्या पर्वावर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्याची प्रथा ही महिला शक्तीच्या सक्षमीकरणाचा महोत्सव असल्याचे प्रतिपादन भाजपाचे चंद्रपूर लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांनी केले. 
गोवरी येथे भाजप महिला आघाडीद्वारा नुकताच हळदी कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास गोवरीच्या सरपंच सौ. उरकुडे, जि.प.च्या सभापती सौ. गोदावरी केंद्रे, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, वाघुजी गेडाम, राजु घरोटे, नत्थुजी ढवस, सुरेश केेंदे्र, केशव गीरमाजी आदी प्रभृती उपस्थित होते. 

हळदी कुंकू हा कार्यक्रम हिन्दू संस्कृतिच्या पवित्रा संस्काराचा एक भाग असून ही परंपरा हजारो वर्षांपासून पाळली जात आहे. कुटूंबातील स्नेहबंध अधिक घट्ट व्हावेत, वैचारीक पातळीवर देवाणघेवाण व्हावी सहकार्याची भावना वृध्दींगत व्हावी व उपयुक्त मार्गदर्शन व्हावे हा उद्दात्त हेतू या कार्यक्रमामागे असल्याने महिलांनी परस्पर विचारातून महिलांचे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी अशा कार्यक्रमातून लाभ घ्यावा असे आवाहन केले. 
या प्रसंगी गोदावरीताई केंद्रे, सरपंच, उरकुडे व उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गोवरी येथील माता, भगिनी बहुसंख्येनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम उत्साहात व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला