जुन्नर नगरपालिका निवडनुक:आघाडीचे ४ तर शिवसेनेला १ सभापती पद

 जुन्नर /आनंद कांबळे :
जुन्नर नगरपालिकेच्या विषय समिती निवडणूकीत राष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १सभापतीपद मिळाले. शिवसेनेला विषय समिती सभापती निवडणूकीत  धोबीपछाड करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते दिनेश दुबे यांनी दिली.
जुन्नर नगरपालिकेचे सभागृहात विषय समितीच्या निवडीकरिता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.पीठासन अधिकारी म्हणून तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी काम पाहिले.यावेळी मुख्याधिकारी जयश्री काटकर याही उपस्थित होत्या.

यावेळी राष्ट्रवादी व मनसेने आघाडी केली.यासभेस राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश दुबे ,उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार ,फिरोजभाई पठाण,लक्ष्मीकांत कुंभार,अक्षय मांडवे,समिना शेख,अब्दुल माजीद सय्यद असे सहा नगरसेवक उपस्थित होते तर अश्वीनी गवळी ,मोनाली म्हस्के या गैरहजर होत्या. मनसेचे जमीरभाई कागदी,हजरा इनामदार , सना मन्सुरी असे तीन नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेला धोबी पछाड देत राष्ट्रवादी व मनसे आघाडीने चार सभापतीपद मिळविले. पाणीपुरवठा सभापतीपदी दिनेश दुबे,वीज समिती सभापतीपदी उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार ,बांधकाम सभापतीपदी लक्ष्मीकांत कुंभार,तर आरोग्य समिती सभापतीपदी जमीरभाई कागदी अशी निवड झाली तर शिवसेनेला एका सभापतीपदी समाधान मानावे लागले .शिवसेनेच्या सौ.सुवर्णा बनकर यांना महिला व बालकल्याण सभापतीपदी मिळाले.

शिवसेनेचे थेट जनतेतून निवडून आलेले शाम पांडे हे नगराध्यक्ष आहेत.मात्र सभागृहात राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत आहे.मनसेची साथ राष्ट्रवादीला आहे.

या निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाच्या समिना शेख यांनी पक्षाशी गद्दारी केल्याने शिवसेनेला एक विषय समितीचे सभापतीपदी पद मिळाले.
राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका समिना शेख यांचे  नगरसेवक पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे असेही गटनेते दिनेश दुबे यांनी सांगितले .

समिना शेख यांच्याबद्दल जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्षलागले आहे.