वनरक्षक-वनपाल यांच्या तक्रार निवारणाकरिता बैठक

चंद्रपूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात आज दिनांक २८/१/२०१९ रोजी चंद्रपूर वनवृत्तातील वनरक्षक-वनपाल यांच्या तक्रार निवारणाकरिता एस.व्ही.रामाराव मुख्य  वनसंरक्षक चंद्रपूर यांचे दालनात बैठक पार पडली. 

सदर बैठकीत मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांनी निर्धारीत कालावधीत सर्व समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले. संघटना व प्रशासन मध्ये अत्यंत सकारात्मक रित्या चर्चा होऊन बैठक पार पडली. 
           बैठकीच्या सुरवातीस अजय पाटील केंद्रीय अध्यक्ष यांनी मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व बैठकीस सुरुवात झाली. वनरक्षक वनपालांच्या विविध समस्याबाबत खुलासेवार चर्चा करून प्रत्येक समस्याबाबत  सकारात्मक तोडगा काढून  उपाययोजना करण्यात आली. बऱ्याच तक्रारीचे निवारण विहित मुदतीत करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांनी आश्वासन दिले. कर्मचारयाचे सेवापुस्तक अद्यावत करणे, निवासस्थानाचे दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे, प्रवास भत्ता, वेतनवाढीची थकबाकी, वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देने, वेतन व वेतनवाढीबाबत, डी.सी.पी.एस. वार्षिक जमा प्रत कर्मचार्यांना उपलब्ध करून देने, नियमित गणवेशाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारी खात्यात जमा करणे, क्षेत्रीय कर्मचारयाना सेवाजेष्टता यादी उपलब्ध करून देने, कर्मचारयाना अद्यावत ओळखपत्र देने, स्थायीत्व प्रमाणपत्र व हिंदी, मराठी भाषा सुट प्रमाणपत्र मिळणे, नियतवनरक्षक यांना बीट मदतनीस देने, विभागामार्फत वनकर्मचारी यांचा विमा काढणे व वैद्यकीय सुविधा पुरविणे, वनसंरक्षण समितीच्या कामकाज सुलभ करणे, चुकीच्या पद्धतीने झालेली वेतननिश्चिती सुधारित करणे, अर्जित व इतर रजा मंजूर करणे इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा वनरक्षक वनपालांच्या तक्रार निवारण सभेत करण्यात आली व तोडगा काढण्याबाबत मुख्य वनसंरक्षक यांनी आश्वासन दिले. 
      आणीबाणीच्या प्रसंगी सामना करण्याकरिता मुख्यलयात विशेष राखीव दल असणे गरजेचे असल्याबाबत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी भूतकाळात घटीत झालेल्या घटनेचा संदर्भ देऊन मुख्य वनसंरक्षक यांना पटवून सांगितले. याबाबत लगेच कार्यवाही करून विशेष राखीव दल मुख्यालयी तैनात करण्याबाबत ठोस पावले तात्काळ उचलले जातील असे ठोस आश्वासन मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिले. 
      मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांचे दालनात पार पडलेल्या तक्रार निवारण सभेत अजय पाटील केंद्रीय अध्यक्ष यांचे शिष्टमंडळात विशाल मंत्रीवार केंद्रीय उपाध्यक्ष, भारत मडावी वृत्तीय अध्यक्ष, लहुकांत काकडे एस.टी.पी.एफ. अध्यक्ष, विजय रामटेके सचिव, नरेश चापले कोषाध्यक्ष, आर.आय.फारुखी, विनोद उईके, गोविंदा तम्मीवार, प्रकाश अनमुलवार, बंडू वांढरे, प्रफुल गेडाम, अविनाश आमवार, अजय बोधे, प्रमोद पर्वतकर, पंकज चुन्ने,  राकेश धनविजय, गोपीचंद राठोड, महादेव मुंडे,  विजय भिमनवार, अजय तिजारे, भीमराव वनकर, भीमानंद चिकाटे, कार्तिक येनुरकर, दिनकर टोंगे, मुरलीधर आमने, व्यंकटी जेल्लेवाड, सुधीर बोकडे, अनंता राखुंडे, कु. सुलभा उरकुडे, कु. विद्या नाट, कु. वैशाली जेणेकर, कु. प्रियंका वेलमे, कु. उज्वला मडावी, कु. सपना मोडक कु. प्रियंका लांडगे, कु. भारती तिवाडे, कु. स्नेहा महाजन, व इतर सर्व वनरक्षक-वनपाल यांचा समावेश होता.