स्टुडंट फोरम ग्रूप कोरपना तर्फे स्पर्धा परीक्षा संपन्न

२१ जानवारीला अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

 कोरपना/प्रतिनिधी:

कोरपना येथील स्टुडन्ट फोरम गृप तर्फे गेल्या अनेक वर्षा पासून ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनीला त्यांच्या आयुष्यत प्रगतीकडे वाटचाल करावी तसेच स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी मार्गदर्शन मिळावे आजच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकावा आपल्या जीवनाचे भवितव्य घडवावे हा उद्देश सामोर ठेवून स्टुडंट फोरम गृप कोरपना अनेक वर्षापासून विद्यार्थी घडविन्याचे महान कार्य करित आहे दि १३ जानेवारीला पाच परीक्षा केद्रावर घेण्यात आल्या वसंतराव नाईक विद्यालय कोरपना कला महाविद्यालय कोरपना महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर व कुरइ वणी या ठिकाणहुन १२६७ विद्यार्थीनी परीक्षा दिली . या परीक्षेत अनुक्रमे उतीर्न होणाऱ्या विद्यार्थीना प्रोत्साहनपर बक्षीस तसेच महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती दोन लाख रुपये देण्यात येणार आहे.

‎ या स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 21 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता महाराष्ट्राचे अर्थ नियोजन व वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. अँड संजय भाऊ धोटे तसेच मा. डॉ महेश्वर रेड्डी सर पोलीस अधीक्षक चंद्रपूर प्रमुख मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत तसेच मान्यवरांच्या हस्ते.

‎ श्री पराग भिवापुरे, (पोलीस उपनिरीक्षक) श्री धीरज कोटरंगे,( राज्य कर सहाय्यक) श्री विकास गावंडे, (सहायक अभियंता महापारेषण) सत्कार मूर्ती चा सत्कार. श्री सागर चौधरी राज्य कर निरीक्षक श्री किशोर निकम राज्य कर सहाय्यक श्री दत्तात्रे जाधव नगर परिषद लेखपाल, श्री. विलय जुनघरे अभियंता श्री वीरेन्द्र मडावी तलाठी, कु. निकिता चैथाली पोलीस शिपाई , कु. प्रियंका सोनपितरे पोलीस शिपाई, श्री निलेश परचाके पोलीस शिपाई, कुमारी अश्विनी झाडे पोलीस शिपाई, श्री. सुरेश पाचभाई मॅनेजर, सलमा बी शेख सत्तार कुरेशी यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहेत स्पर्धा परीक्षांचे आयोजन स्टुडंट फोरम ग्रुप करण्याच्या सर्व सभासदांचे सर्व स्तरा वरून यांच्या सक्रिय कार्याबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे.