जुनोना येथे संक्रांती निमित्य हळदी कुंकू कार्यक्रम

जुनोना/अमोल जगताप:

सामाजिक कार्यात अग्रेसर असणार सत्यशोधक माळी समाज जुनोना यांनी सामाजिक प्रभोधना साठी दिनांक 15 जानेवारी ला मकर संक्रांतीच औचित्य साधून गावातील महिलांसाठी हळदीकुंकू च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.
ह्या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे स्मरण करून मंगला वसाके यांनी खूपच छान मार्गदर्शन केलं, तर सामाजिक गीते इतर महिलांनी सादर केली.ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सौ. चंदाताई देवगडे व प्रमुख अतिथी म्हणून ग्राम पंचायत जुनोना सदस्या मंगला वसाके, शशिकला मांढरे, मालाताई मेश्राम, ज्योती आलाम, व गावातील स्त्री वर्ग सुरेखाताई आदे, बेबीताई वाडगुरे, मायाताई आदे, अर्चना चौधरी, वनिता मोहूर्ले, वीणाताई ढोले, सुनीताताई मोहूर्ले, अर्चनाताई चौधरी, सुनीता मोहूर्ले, विना ढोले, वनिता मोहूर्ले, स्नेहा वाढई, उषा लेनगुरे, मोहना कोटरंगे, सविता बोरूले, शुभांगीताई कोटरंगे, वंदना ठाकरे व मोठ्या संख्येने महिलांची उपस्थित होती.