वाघाच्या हल्यात मेंढपाळ व दोन बकऱ्या ठार

मूल/रमेश माहूरपवार:-


मूल तालुक्यातील चिचाळा वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र.525 मधील कवडपेठ येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक मेंढपाळ व दोन बक-या ठार झाल्याची घटना आज दुपारी २ वाजतच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव मारोती पुठ्ठावार, वय ६५ वर्ष, रा. येरगाव असे आहे . 
मारोती पुठ्ठावार याने कवडपेठ येथे एका शेतात शेळ्या, मेंढ्या बसविले आहे. काही शेळ्या घेवुन जंगलात चरायला गेला होता. त्या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढविला. त्यात दोन शेळ्या व मारोती पुठ्ठावार हा ठार झाला. उत्तरीय तपासणी करीता पुठ्ठावार यांचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पुढील तपास वनविभाग करित आहे.