शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून पक्ष वाढवा:खा.कृपाल तुमाने

वाडीत सेनेचा पदाधिकारी मेळावा 
 नागपूर / अरूण कराळे: 

महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होऊ नये यासाठीच शिवसेनेची स्थापना झाली असून मराठी माणसासोबत विविध भाषेच्या लोकांना संघटीत करून पक्ष संघटनेचे मजबूत कार्य शिवसेनाप्रमुखांनी केले आहे . लोकहितार्थ कार्याची जपवणूक करणारा शिवसैनिक निर्माण झाल्याने पक्षाची जनमानसात छाप आहे. ही छाप कमी न होऊ देता शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून पक्ष वाढवा असे आवाहन खासदार कृपाल तुमाने यांनी केले .

वाडी येथील शुभम मंगल कार्यालयात रविवार २० जानेवारी रोजी आयोजीत पदाधिकारी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून कृपाल तुमाने बोलत होते .व्यासपीठावर हिंगणा विधान सभेचे संपर्कप्रमुख अशोक सकपाळ , जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे ,उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर पाटील ,माजी उपजिल्हाप्रमुख संतोष केचे , हरीशभाई हिरणवार ,विधानसभेचे नेते दिवाकर पाटणे , विधानसभा संघटक रविभाऊ जोडांगडे , नागपूर तालुका प्रमुख संजय अनासाने,वाहतूक सेनेचे सरचिटणीस किताबसिंग चौधरी , उपतालुकाप्रमुख रुपेश झाडे , शहर प्रमुख प्रा. मधुभाऊ माणके पाटील ,शहर कोषाध्यक्ष वसंतराव ईखनकर , शहर संघटक शत्रुघ्नसिंह परीहार ,प्रसिद्धी प्रमुख दिपक रहांगडाले , गिरीश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.निवडणुका जिंकण्यात बुथप्रमुख व बीएलओ यांचा सिंहाचा वाटा असतो तेव्हा मतदार याद्यांचा अभ्यास करुन विजयासाठी आवश्यक एवढ्या मतदारांच्या दरवाज्या पर्यंत पक्षाचा बुथप्रमुख पोहचलाच पाहीजे आणि त्याचा अहवाल मध्यवर्ती शिवसेना कार्यालयापर्यंत वेळेतच पोहचला पाहीजे असा पक्षप्रमुखा कडून आलेला आदेश विधानसभा संपर्क प्रमुख अशोक सकपाळ यांनी वाचून दाखविला .वाहतूक सेना,कामगार सेना , युवा सेना या शिवसेनेला मजबुत करण्यासाठी संघटना असुन या संघटनांच्या पदाधीका-यांनी शिवसेनेच्या पदाधीका-यांना विश्वासात घेवून पक्षाला बळकटी मिळेल असेच काम करावे . असे प्रतीपादन जिल्हाप्रमुख राजेन्द्र हरणे यांनी केले. सर्वप्रथम वार्ड क्रमांक १ येथील कोहळे ले आऊट व वार्ड क्रमांक ३ येथील गौतम नगर टेकडी वाडी या शाखांच्या फलकाचे अनावरण खासदार तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक व संचालन प्रा. मधुभाऊ माणके पाटील यांनी केले.
 यावेळी मदनसिंग राणा , किशोर ढगे, राजा अय्यर ,विलास भोंगळे ,प्रकाश मेंढे ,अनील विधळे , दत्ता वाघ , संजय बोराडकर ,रघुजी नागलवाडे,प्रदिप रोकडे ,पुरुषोत्तम गोरे, सतपाल सिंग राजपूत ,केशव खोब्रागडे,संतोष दुबे, शिवनारायण पवार , अमोल सोनसरे ,अमोल समरीत , मुकुंद आसरे सुरजीत बघेल , राजेश बानीया , अॅड . अरुण तैले , दिवानजी रहांगडाले , क्रिष्णा रायबोले संतोष केसरवाणी, विनोद अतकरी ,शिवम राजे , योगेश व्यास , जयपाल बडगे ,चंदन दत्ता , प्रमोद जाधव ,राजु अतकरी ,ललीत येडे ,महेश पींगळे ,रवी ढेंगे , विठ्ठल राव ,चेतन बडगे , उमेश महाजन ,अजय देशमुख , क्रिष्णाजी वडे, नरेश मसराम, कैलाश माळवे ,उत्तमजी देठे ,विजय चुटे , मंगेश चौरपगार प्रामुख्याने उपस्थित होते.