सह्याद्री ट्रेकर्सच्या सायकलस्वारांनी मायणी ते जगन्नाथपुरी (१६५०किमी) ची मोहीम केली फत्ते

पर्यावरण संतुलन व वृक्षलागवडीचा समाजाला दिला संदेश
मायणी/सातारा:

सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या नऊ सदस्यांनी ६ जानेवारीला मायणीतून निघून जगन्नाथपुरी (ओरिसा) पर्यंत सुमारे सोळाशे पन्नास किलोमीटपर्यंत प्रवास सायकलने करीत आज जगन्नाथपुरी येथे सुखरूप पोहचून आपली सायकल रायडींग ची मोहीम फत्ते केली. या संपूर्ण प्रवासादरम्यान सायकल चालवा पर्यावरण वाचवा , इंधनाची बचत काळाची गरज, आरोग्यासाठी उत्तम व्यायाम सायकल चालवा असा संदेश देत त्यांनी आपले ध्येय साध्य केले.

मायणी येथुन सहा जानेवारीला सर्वांचा निरोप घेऊन मंगळवेढा ,सोलापूर ,नळदुर्ग , ऊमरगा ,भांगुर, हैद्राबाद ,सुर्यापेठ , विजयवाडा , निडादवेल्लू ,नाकापल्ली ,राणास्थलम, हरीपुरम, मालुड, ब्रम्हगिरी यामार्गे प्रवास करीत जगन्नाथपुरी हे १६५० किलोमिटरचा सायकलचा प्रवास पूर्ण केला .या प्रवासादरम्यान सर्व सायकलस्वारना उत्तर भारतात स्थायिक असलेले गलाई व्यावसायिक बंधूनी ठिकाठिकानी स्वागत करून मुक्कामाची सोय उपलब्ध करून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या सायकल मोहिमेत विजय वरुडे,शिवाजी कणसे, राजेंद्र आवळकर, अनिल कुलकर्णी,सुनिल कुलकर्णी सर्व रा.मायणी ता.खटाव ,अंबरिष जोशी,किर्लोस्करवाडी ता.पलुस, मिलींद कुलकर्णी , मिरज ता.मिरज, किशोर माने सांगली व सागर माळवदे.पुणे हे नऊजण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या प्रवासात सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या सर्वांचे वर ४० वर्षाहून अधिक आहे.

  यापुर्वी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपतीपुळे, नळदुर्ग आणि कन्याकुमारीच्या असा सायकलने प्रवास केला आहे. आता जगन्नाथपुरी हे १६५० किलोमीटर आंतर प्रवास करुन येताना रेल्वेने येणार आहेत.

(जगन्नाथपुरी येथे पोहचल्यानंतर एकत्रित आलेले सह्याद्री ट्रेकर्स चे सर्व सायकलस्वार .छायाचित्र--दत्ता कोळी )

  आजच्या धावपळीच्या युगात सर्वजण आपले आयुष्य सुधारण्यासाठी व्यावसायिक गाडा ओढत खऱ्या जीवनशैली विसरत चालले आहेत . परंतु आपल्या व्यवसायिकतेला जपत निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची उत्सुकता आणि गडकिल्ले सर करण्याची आवड असल्याने सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप च्या वतीने आम्ही सर्वांनी मायणी ते जगन्नाथपुरी हे १६५० किमीचे अंतर पार केले आहे यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.
 - शिवाजी कणसे . सायकलस्वार.मायणी.