चंद्रपूरात आज पासून भव्य महामेळावा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 à¤†à¤°à¥‹à¤—्य तपासणी साठी इमेज परिणाम
चंद्रपूर जिल्हयात 17 व 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चांदा क्लब ग्राऊंडवर होणा-या भव्य रोग निदान, उपचार व आरोग्य प्रदर्शनीत मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले आहे. नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर, यांचे सुचनेनुसार दिनांक 17 व 18 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता चांदा क्लब ग्राउंड, वरोरा नाका, चंद्रपूर येथे भव्य रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शनी महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 
या महामेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांचे हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा अर्थ,नियोजन व वने मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून अध्यक्ष वनविकास महामंडळ चंदनसिंह चंदेल, महापौर अंजली घोटेकर, विधान परिषद सदस्य नागो गाणार, अनिल सोले, रामदास आंबटकर, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, सुरेश धानोरकर, राजु तोडसाम, संजीव रेड्डी बोदकुरवार, उपमहापौर अनिल फुलझेले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. हा आरोग्य मेळावा विशेषतज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर दोन दिवसीय महामेळाव्या करीता किमान दहा ते बारा हजार रूग्णांना सेवा देण्यात येणार आहेत. 

या दोन दिवसीय महामेळाव्याकरीता तज्ञ डॉक्‍टरांची सेवा रूग्णांना देणेकरीता 25 स्टॉल, आरोग्य प्रदर्शनीकरीता 25 स्टॉल, औषध वितरण कक्षाकरीता 6 स्टॉल, नोंदणी कक्षाकरीता 6 स्टॉल व चौकशी/मदत कक्षाकरिता 2 स्टॉल असे एकुण 64 स्टॉल तयार करण्यात येतील या व्यतीरीक्त भोजन कक्ष, स्वयंपाक गृह तसेच इतर आवश्यक कामाकरीता वेगवेगळे कक्ष तयार करण्यात येत आहे.

सदर दोन दिवसीय भव्य रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शनी महामेळावा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मा.डॉ.महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे यांचे प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमारीता नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, सांवगी येथील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युध्द मोघे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद राऊत, आयएपी संघटचे अध्यक्ष डॉ एम.जे खान, मिना संघटनेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, आयुर्वेदिक व्यासपिठचे अध्यक्ष डॉ राजीव धानोरकर, होमीओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद कोयाडवार यांचे उपस्थितीमध्ये पार पाडण्यात येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे यांनी सदर महामेळाव्याचा जिल्हयातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.