शताब्दी शाळेची हटकेश्वर ज्ञानमंदिर गोद्रे


जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुक्यातील १००%आदिवाशी समाज असलेल्या गोद्रे येथील जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिर शाळेस १००वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर रेंगडे यांनी दिली.
आदिवाशी भागातील हटकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोद्रे या गावात १जून १९१९ रोजी इंग्रज शासनाने मराठी प्राथमिक शाळा सुरु केली.ही शाळा आता जिल्हा परिषदेमार्फत चालविली जाते.शाळेचे सध्याचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे आहे.या शाळेस पूर्वीचेच नाव देण्यात यावे याबाबत जिल्हा परिषदेने ठराव करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पूर्वी ज्ञान मंदिर गोद्रे असे नाव होते.

शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ९व १० फेब्रुवारी  रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
९ फेब्रुवारी सकाळी प्रभात फेरी,महोत्सवाचे उद्घाटन आदिवाशी मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते होत आहे.यावेळी पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण व इतर  मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. क्रिडास्पर्धा, राज्यस्तरीय काव्य संमेलन यामध्ये कवी तुकाराम धांडे व अन्य कवी उपस्थित राहणार आहेत.तसेच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ,महिलांसाठी पारंपारिक गीतगायन ,भजनी मंडळाचा कार्यक्रम
तर १० फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा , राहुल शिंदे यांचे शिवव्याख्याण, आदिवाशी संस्कृती व संवर्धन कांबडानृत्य (उडदावणे ता.अकोले )त्याचप्रमाणे  गुणगौरव सन्मान सोसोनवणे  व माजी मंत्री मधुकर पिचड ,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरददादा सोनवणे व तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थित होत आहे.या शताब्दी महोत्सवास गोद्रे ग्रामस्थ  व माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येणार आहेत असेही शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष  मधुकर रेंगडे यांनी सांगितले .