शिवकालीन इतिहास व स्वराज्याची अस्मिता जपण्यासाठी किल्लेसंवर्धन महत्वाचे:प्रा.विनायक खोत

जुन्नर /आनंद कांबळे:

ज्या गड-किल्ल्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेच महाराष्ट्रातील गडकिल्ले आज अखेरचा श्वास मोजत आहेत. शिवकालीन इतिहास व स्वराज्याची अस्मिता जपण्यासाठी या गड- किल्लेसंवर्धन होणे महत्वाचे आहे. असे मत दुर्गसंवर्धक संस्था शिवाजी ट्रेल चे विश्वस्त प्रा.विनायक खोत यांनी व्यक्त केले.

राजगुरूनगर मेडीकल प्रक्टीसनर असोशिएशनच्या वतीने राजगुरूनगर(पुणे) येथे आयोजित डॉक्टरांच्या मेळाव्यात प्रा.खोत बोलत होते. यावेळी राजगुरूनगर मेडीकल प्रक्टीसनर असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, शिवाजी ट्रेलचे संचालक व किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांसह राजगुरूनगर परिसरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते. या प्रसंगी दुर्गसंवर्धनातील कार्याबद्दल राजगुरूनगर मेडीकल प्रक्टीसनर असोशिएशनच्या वतीने प्रा.विनायक खोत यांचा सत्कार करण्यात आला.