अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या ६ पोलिसांचे निलंबन

नागपूर/प्रतिनिधी:
 मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू याला आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती.याला साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी त्याची गंभीर दखल घेत नीलेश पुरभे, मनोज ओरके, शरद सिकने आणि साजीद मोवाल या चार पोलीस उपनिरीक्षकांच्या तसेच कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्राच्या निलंबनाचे आदेश जारी केले. 
पोलीस निलंबित साठी इमेज परिणाम

या घटनेमुळे महाराष्ट्र पोलिसात चांगलीच खळबळ उडाली आहे, ड्रग्सच्या काळ्या कारभारात काही पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कानावर आली असता त्यांनी या घटनेची दखल घेत.हि कारवाई केली.पोलीस कर्मचारी जयंता शेलोटचे आबूच्या फोनवर चक्क ८०० कॉल्स आढळले.जयंताला यापूर्वीही अनेकदा निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेमुळे आणखी अवैध धंद्याला साथ देणाऱ्या प्रशासनातील अधिकार्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.