उपरवाही ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी ढेंगळे यांना मारहाण प्रकरण, जिल्हाभरातून निषेध!

 
 
उपरवाही ग्रामपंचायत येथील  ग्राम विकास अधिकारी ढेंगळे यांना मारहाण प्रकरण, जिल्हाभरातून निषेध!

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना  पंचायत समिती   मध्ये येत असलेल्या ग्रामपंचायत  उपरवाही  येथील ग्राम विकास अधिकारी श्री ढेंगळे  यांना दिनांक 9/7/ 2019 ला  ग्रामपंचायतयेथे कामकाज करीत असताना गावगुंडांनी कार्यालयात येऊन मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला . या प्रकरणाची सर्व स्तरावरून निषेध करण्यात येत आहे.  कार्यालयातून बाहेर काढून महान करणे ही बाब शासकीय कर्मचाऱ्यांची निंदानालस्ती करणे, कार्यालयात गलिच्छ शब्दात शिवीगाळी करणे, कामात अडथळा करणे, अशा प्रकारचे गाव गुंड येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करणे.  या झालेल्या सर्व प्रकरणाचा  म. ग्रा. यू. जिल्हा शाखा  तर्फे ग्रामसेवक संघटनेने  निषेध करून रोष व्यक्त केला आहे.  असे कृत्य करणाऱ्या वर  तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी संघटनेकडून केली जात आहे.  झालेल्या घटना संदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार नोंद केली असून  गुन्हेगारावर  कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भात चंद्रपूर पंचायत समिती परिसरात  ग्रामसेवक संघटनेच्यावतीने निदर्शने व झालेल्या घटनेचा निषेध  करण्यात आला. यावेळी ग्राम विस्तार अधिकारी नागदेवते.  व्हिडिओ नगराळे, ग्रामसेवक चौधरी,  केंद्रे, देवगडे, दुर्वे, ग्रामसेवक  केवे, ग्रामसेविका  सौ. माथनकर,  सौ नंदेश्वर मॅडम,  सौ.  टापरे  मॅडम.  सौ ढाले मॅडम, बागडे मॅडम, ग्रामसेवक निमसरकार, ग्रामसेवक बोरेवार,  ग्रा. वि. अ. येवले,    ग्रा. वि.अ.वासाडे,  ग्रामसेवक खोब्रागडे ,   इत्यादी  ग्रामसेवकांची उपस्थिती  होती.