नगाजी पारडी तीर्थक्षेत्र घोषित करण्याचे नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आश्वासन!






नगाजी पारडी तीर्थक्षेत्र करण्याचे नामदार सुधीर 
            मुनगंटीवार यांनी दिले आश्वासन!
 महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपुर यांचे निवेदन!
चंद्रपूर -  नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज,   पार्डीला  तीर्थक्षेत्र घोषित करून 'क' वर्गातून 'ब' वर्ग  दर्जा देण्यात यावा,  पार्डी ते टेंभा,  वना नदीवर पूल  निर्माण करण्यात यावा.  पार्टी तीर्थक्षेत्र साठी विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी  चंद्रपूर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा यांच्यावतीने दिनांक ३१/८/२०१९ ला  जिल्ह्याचे पालकमंत्री,   तथा  राज्याचे वित्त, वनमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना  निवेदन देण्यात आले.  यावेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर,  चिमुर गडचिरोली चे खासदार माननीय अशोकजी नेते,  यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर,   बाराबलुतेदार  जिल्हा कार्याध्यक्ष  श्यामभाऊ राजूरकर,  जिल्हा कार्याध्यक्ष माणिचंद चन्ने, जिल्हा सचिव उमेश नक्षीने,   संतोषभाऊ  आतकरे,  शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार,  सुनील कडवे,  प्रदीप नक्षीने,  अँड. श्याम नागतुरे,  रवी हनुमंत,  प्रशांत पांडे,  कुणाल कडवे,  तसेच  नाभिक समाज बांधवांनची उपस्थित होती.
   महाराष्ट्र राज्यातील  वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील पार्डी  येथील नाभिक समाजासह सर्व समाजाचे आराध्य दैवत असणारे श्री संत नगाजी महाराज पार्डी हे गाव वर्धा, चंद्रपूर,  यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमा लगत असून संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दरवर्षी येथे यात्रेला, बार माही दर्शनाला येत असतात.  दोन जिल्ह्याच्या सीमेवर नदी  असल्यामुळे  पारडीला येण्यासाठी  हिंगणघाट मार्गे यावे लागते.  परंतु तो मार्ग अतिशय खराब व निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे भाविक भक्तांना नहाक मानसिक,  शारीरिक,  आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो.  हा त्रास व अंतर कमी करण्यासाठी पारडी ते टेंभा  दरम्यान वना नदीवर   पुलाची  निर्मिती करण्यात यावी.  अनेक गावातील पालख्या व भाविक भक्त  दर्शनासाठी येत असल्यामुळे  राहण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने या ठिकाणी भक्त निवारा उपलब्ध करून देण्यात यावा.
 चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, येथील नाभिक समाजासह इतर समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज पारडी हे   तीर्थक्षेत्र  करून 'क'  वर्गातून  'ब' वर्ग  दर्जा देण्यात यावा. तसेच पारडी  ते टेंभा  वना नदीवर पूल निर्माण करून,  पारडी  तीर्थक्षेत्र साठी विकास निधी उपलब्ध करून या क्षेत्रातील हिंगणघाट ते पारडी जाणारा रस्ता भाविक भक्तांसाठी सुरळीत करण्यात यावा या सर्व जनसामान्यांशी निगडीत प्रश्न सोडवून या भागातील विकासाला सहकार्य करावे. आपण आतापर्यंत दिलेला शब्द  हा  सार्थ  ठरला.  नाभिक समाजाला आपण दिलेला शब्द नक्कीच पूर्ण होईल असे आश्वासन नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.