भद्रावती शहरात कोणाच्या आशिर्वादाने दारूचा महापूर, पोलिस प्रशासनच मदमस्त!



चंद्रपूर जिल्हात दारू बंद झाली आणी पोलीस प्रशासन मदमस्त झाले. 

शहरात सद्ध्या अवैध दारू सगळीकडे मिळत असून काही ठिकाणी अवैध दारूचे अड्डे बनलेले आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकल्या जात असेल तर ती येते कोणत्या मार्गाने आणि  ती आणणारे ठोक व्यापारी तस्कर कोन ? हे पोलिसांना माहित नसावे किंवा यांच्या आशीर्वादाने तर नाही ना?नाही तर प्रशासन मांजरीच सोंग घेऊन दुध पिण्याच्या बहाना करून . पोलिस आहेत का ? असा प्रश्न या अर्थाने सर्व जनतेला पडला आहे. महत्वाची बाब म्हणजे पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शहरात अवैध दारू येणे शक्य नाही. त्यामुळे या अवैध दारू विक्री मधे पोलिसांचा मोठा हातभार लागला असल्याचे दिसते.आता यादव ठाणेदार जावून पवार हे नवे ठाणेदार आले पण पाहिजे तो फरक अवैध दारू विक्रीवर पडला नसल्याने ठाणेदार पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी एका राजकीय महिलेच्या नावानी अद्न्यात व्यक्तीने पंतप्रधान यांच्यासह पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांच्या नावाने काही अवैध दारू विक्रेत्यांची तक्रार केली होती त्यामुळे आता पोलिस प्रशासनाकडे अवैध दारू विक्री करणाऱ्यांची नावेच असल्याने ते त्यांच्यावर का करवाई करीत नाही ? हा मोठा प्रश्न असून आता पोलिस प्रशासनाकडे एक पोलिस कर्मचारी अवैध व्यावसायिकाकडून वसुली करीत असल्याने व ही रक्कम लाखांच्या घरात असल्याने पोलिस जाणीवपूर्वक अवैध दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करीत आहे असे चित्र दिसत आहे.