राजुरा पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रताप.गुन्हे दाखल नसताना महिलेस विवस्त्र करून केली बेदम मारहाण.
महिलेस विवस्त्र करून मारहाण करणे पोलिसांना भोवणार, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
राजुरा प्रतिनिधी :-
पोलिस विभाग सद्ध्या भाजप शासन काळात एवढा मस्तावलेला आहे की अवैध धंदेवाईकांना सरक्षण आणि सर्वसामान्य जनतेसाठी कर्दनकाळ ठरत आहे. खरं तर महिलांचे सरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पोलिस विभागाचे आहे मात्र आता पोलिसच महिलांच्या इज्जतीवर हात टाकत असेल तर महिलांची अब्रू वाचेल कशी ? हा गंभीर प्रश्न आहे.नुकत्याच राजुरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हडस्ती गावातील एका महिलेस चोरी केल्याचा आरोप असल्याचे सांगून राजूरा पोलिसांनी नग्न करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी महिलेच्या गुप्तागांत मिरची पावडर टाकुन निर्दयपणे तीला मारहाण करण्यात आली होती.
महत्वाची बाब म्हणजे ज्या फिर्यादीने पिडीत महिले विरोधात तक्रार राजुरा पोलिस स्टेशनमधे दिली त्यावेळी तिची कसून चौकशी करून तिचेवर गुन्हे दाखल व्हायला हवे होते मात्र प्रकरण नोंदणीकृत झाले नसताना पोलिसांनी ज्या क्रूरपणे त्या महिलेस मारहाण आणि तिची विटंबना केली ते अमानवीय कृत्य पोलिस कसे करू शकतात ? आणि कायदा कसा काय हातात घेऊ शकतात ? हा गंभीर प्रश्न आहे.
कुठल्याही गुन्हेगारांना मारण्याचे अधिकार पोलिस प्रशासनाला नसताना व पोलिस स्टेशनमधे गुन्हाच दाखल नसताना पोलिस कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने हे नीच क्रुत्य केलं आहे त्या क्रुत्याला न्यायालय सुद्धा माफी देवू शकत नाही आणि अशा पोलिस कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांचे विरोधात विनयभंग आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करणे महत्वाचे असतांना वरिष्ठ पोलिस प्रशासन गप्प का आहे ? असा प्रश्न जनचर्चेतून पोलिस प्रशासनाला विचारल्या जात आहे.
जेंव्हा या पिडीत महिलेस पोलिसांनी मारहाण करून व तिच्या गुप्तांगाशी खेळून जी मजा मारली व तिला तिच्या घरी सोडून दिले त्यावेळी तिची प्रक्रुती गंभीर झाली होती व तिला बरोबर चालता सुद्धा येत नव्हते म्हणून ती रुग्णालयात भरती झाली आणि आता आपल्यावर हे प्रकरण शेकणार म्हणून स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी तिच्यावर चोरीचे खोटे गुन्हे दाखल केले आहे जो एकप्रकारे तिचेवर जाणीवपूर्वक अन्याय आहे.
या संदर्भात काही संघटनांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे तक्रार देवून पिडीत महिलेस न्याय द्यावा व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती.पण कुठलीच करवाई झाली नाही याचा अर्थ पाणी कुठे तरी मुरत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनच आता चौकशीच्या घेऱ्यात सापडले असून “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलिस ब्रीदवाक्याला हड़ताळ फासणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर व राजुरा पोलिस ठाणेदार यांचेवर त्वरित करवाई होणे आवश्यक आहे.
प्रकरण असे झाले.
मुळ हडस्ती येथीलrरहिवासी पीडित महिला ही रामपूर राजूरा येथील रामचंद्र बुटले यांचेकडे घरकाम करीत होती. १७ नोव्हेंबर २०१९ रोज रविवार ला सांय. ४ वाजता राजुरा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर महिलेच्या हडस्ती येथील घरी येऊन तिला व तिच्या पतीला पोलिसांच्या वाहणात राजूरा पोलिस ठाण्यात आणले. येथे तिने रामचंद्र बुटले यांच्या घरी चोरी केल्याचा आरोप करत तिला व तिच्या पतीला राजुरा पोलीस स्टेशन पोलिसांनी मारहाण केली. यावेळी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले व तीन ते चार पोलिस कर्मचाऱ्यांनी (पुरूष) रबरी पट्यानी मारहाण केली तसेच अश्लील वर्तन केले त्यानंतर रात्री १० वाजता पिडीतेला व पतीला पोलीसांनी पोलिसांच्या वाहणात घरी सोडून दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी १० वाजता त्यांना पोलिस स्टेशनला बोलविले. यावेळी पिडीतेच्या पतीला पोलीसांनी बाहेर थांबण्यास सांगितले. पिडीतेला आतिल रूममध्ये नेले. यावेळी पहील्या दिवशी असलेल्या एका महीला पोलिस कर्मचाऱ्यासह एक महिला पोलीस कर्मचारी अश्या दोन महीला पोलीस कर्मचारी व तीन पुरूष पोलीस कर्मचारी आत होते. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी चोरलेले सोनं परत कर असे म्हणत पिडीतेला मारहाण करण्यास सुरूवात केली. मात्र पिडीता मी चोरी केलीली नाही असे वारंवार सांगत होती. मात्र तरीही पोलिसांनी मारहाण सरूच ठेवली. यावेळी पिडीतेच्या अंगावरची साडी काढुन तीला पुरूष पोलिस कर्मचाऱ्यासमोरच नग्न करण्यात आले. व पिडीतेच्या मागच्या बाजस पट्टयाने मारहाण केली. तसेच तिला खाली झोपवून तळहातावर व तळपायावर रबरी पट्टयाने बेदम मारहान केली. त्यानंतर तिच्या दोन्ही मांडीवर लाथ देऊन उभे होऊन महीला पोलिसाने तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकुन गुप्तांगावर मारहाण केली. या शारीरीक वेदनेने पिडीत अर्धबेशुध्दी झाली. तरी ती नाटक करीत आहे. असे म्हणत पोलिसांनी मारहाण सुरूच होती. त्यानंतर पिडीत थोडी शुध्दीवर आल्या नंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीने रात्री १० वाजता पिडीतेला घरी सोडले. पिडीतेला असाहय वेदना होत असल्याने दसऱ्या दिवशी बुधवारी पिडीतेच्या घरच्यांनी राजुरा येथील ग्रामिण रूग्णालयात भरती केले. तेथे तिन दिवस तिच्यावर उपचार चालला मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात तिला रेफर करण्यात आले. येथे दोन दिवस तिच्यावर उपचार चालले. सकेवळ संशयीत म्हणून र पोलिसांनी तिच्या सोबत अमानवीय कृत्य केले आहे. हा कायदयाच्या दुरुपयोग आहे. त्यामूळे चुकी नसतांना केवळ संशयीत म्हणून असे अमानविय क्रुत्य पोलिस कर्मचारी यांनी केल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करून तत्काळ निलंबनाची करवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.