पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्‍या निवडणूकीत भाजपाचा दणदणीत विजय

*पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्‍या निवडणूकीत भाजपाचा दणदणीत विजय*
*चंद्रपूर, बल्‍लारपूर, मुल, सिंदेवाही, ब्रम्‍हपूरी, गोंडपिपरी, भद्रावती या पंचायत समित्‍यांवर भाजपाचा झेंडा*
 
चंद्रपूर जिल्‍हयातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्‍या आज झालेल्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून चंद्रपूर, बल्‍लारपूर, मुल, सिंदेवाही, ब्रम्‍हपूरी, गोंडपिपरी, भद्रावती या पंचायत समित्‍यांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
 
चंद्रपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या केमा रायपुरे तर उपसभापतीपदी निरीक्षण तांड्रा निवडून आले आहेत. बल्‍लारपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या सौ. इंदिरा पिपरे तर उपसभापतीपदी सोमेश्‍वर  पदमगिरीवार निवडून आले आहेत. मुल पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाचे चंदू मारगोनवार तर उपसभापतीपदी घनश्‍याम जुमनाके हे निवडून आले आहेत. गोंडपिपरी पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या सुनिता येग्‍गेवार तर उपसभापतीपदी अरूण कोडापे हे निवडून आले आहेत. सिंदेवाही पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या सौ. मंदा बाळबुधे तर उपसभापतीपदी सौ. शिला कन्‍नाके  यांची निवड झाली आहे. ब्रम्‍हपूरी पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाचे रामलाल दोनाडकर यांची निवड झाली आहे. भद्रावती पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या कु. नाजूका मंगाम तर उपसभापतीपदी प्रविण ठेंगणे विजयी झाले आहेत. जिवती पंचायत समितीच्‍या उपसभापती भाजपाचे महेश देवकते व सावली पंचायत समितीच्‍या उपसभापतीपदी श्री. रविंद्र बोलीवार विजयी झाले आहेत. पोंभुर्णा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार असून याठिकाणीही भाजपाचा विजय निश्‍चीत मानला जात आहे.
 
नवनिर्वाचित सर्व पंचायत समिती सभापती व उपसभापतींचे भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार नानाजी शामकुळे, माजी आमदार संजय धोटे, आमदार किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, जिल्‍हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्‍य संजय गजपूरे जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष कृष्‍णा सहारे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष ब्रिजभूषण पाझारे, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा सौ. रेणुकाताई दुधे, बल्‍लारपूर तालुका भाजपाचे अध्‍यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, राजू बुध्‍दलवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य हरीश गेडाम, सौ. वैशाली बुध्‍दलवार मुल तालुका भाजपाध्‍यक्ष सौ. संध्‍या गुरनुले, पृथ्‍वीराज अवताडे, चंद्रपूर तालुका भाजपाचे अध्‍यक्ष हनुमान काकडे, जिल्‍हा परिषद सदस्‍य वनिता आसुटकर, रोशनी खान, गौतम निमगडे, चंद्रपूर तालुका भाजपाचे अध्‍यक्ष नामदेव डाहूले, ब्रम्‍हपूरी तालुका भाजपाचे अध्‍यक्ष नानाजी तुपट, सिंदेवाही तालुका भाजपाचे अध्‍यक्ष राजू बोरकर, सावली तालुका भाजपाचे अध्‍यक्ष अविनाश पाल, जिवती तालुका भाजपाचे अध्‍यक्ष केशवराव गिरमाजी, गोंडपिपरी तालुका भाजपाचे अध्‍यक्ष बबनराव निकोडे, भद्रावती तालुका भाजपाचे अध्‍यक्ष तुळशिराम श्रीरामे आदींनी अभिनंदन केले आहे.