वरोरा येथे जिल्हास्तरीय स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिराआयोजन !

वरोरा येथे जिल्हास्तरीय स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिराआयोजन !

 दिनांक १ व २ फेब्रुवारीला होणाऱ्या या शिबिरामध्ये बेरोजगार युवक, युवती व महिला बचत गटांनी सहभागी होण्याचे रमेश राजूरकर यांचे आवाहन ! 

चंद्रपूर :-

जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा तथा रूरल चेम्बर ऑफ कॉमर्स इंडिया च्या वतीने शहरातील क्रिडा संकुल रेल्वे स्टेशन रोड येथे भव्य स्वयंरोजगार व उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बेरोजगार युवक, युवती व महिला बचत गटांनी या शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक सामाजिक नेते रमेश राजूरकर यांनी केले आहे.

देशाचे आणि राज्याचे सरकारी नौकरी संदर्भात धोरण हे आता खाजगीकरणाचे असून कंत्राटी पद्धतीने ज्या नौकऱ्या अनेक शासकीय कार्यालयात आहे त्यामधे आरक्षण नाही आणि त्या कंत्राटी कंपनीमधे स्थानिक बेरोजगार युवकांना स्थान मिळेल याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे चांगले शिक्षण असून सुद्धा नौकरीच मिळत नसलेला बेरोजगार युवक आता हवालदिल झाला आहे, आणि तो नौकरीच्या शोधात वणवण भटकत आहे. अशा स्थितीत तरून बेरोजगारांची फौज दरवर्षी वाढत असून चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर एका वर्षी आईटीआय, इंजिनियर, डॉक्टर्स, डी एड, बी एड. आणि पदवीधर असे एकून ३० ते ५० हजार बेरोजगार नौकरीच्या शोधात निघत असतात, पण महत्वाची बाब अशी आहे की ज्या प्रमाणात दरवर्षी जवळपास ५० हजार बेरोजगार तयार होतात परंतु जुन्याच लोकांना रोजगार किंव्हा नौकऱ्या सरकारने दिल्या नाही तर बाकी नवीन बेरोजगाराना काय संधी मिळणार ? आणि म्हणूनच आता तरून बेरोजगाराना स्वयंरोजगार किंव्हा स्वतःचा उद्योग करण्याशिवाय पर्याय नाही.

या संदर्भात सामजिक नेते व रूरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचे उपाध्यक्ष रमेश राजूरकर यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून स्वयंरोजगार व उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन क्रिडा संकुल रेल्वे स्टेशन रोड वरोरा येथे दिनांक १ ते २ फेब्रुवारी २०२० ला करण्यात आले आहे. या शिबिरात देशपातळीवरील उद्योजक व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन होणार असून व्यवसायाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. एकूणच बेरोजगार युवक, युवती व महिलांना या शिबिर कार्यक्रमातून स्वतःचा स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा मिळावी या व्यापक दृष्टीकोनातून या स्वयंरोजगार व उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी या शिबिराला जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक युवती व बचत गटातून व्यवसाय निर्माण करणाऱ्या इच्छुक महिलांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आव्हान वरोरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे शिबिराचे मुख्य आयोजक रमेश राजूरकर यांनी केले आहे. या प्रसंगी राजू कुकडे, मुकुल राजूरकर यांची उपस्थिती होती