ओबीसी जाती निहाय जनगणना दडपण्यासाठी सीएए, एनआरसीचा उपयोग - कल्याण दळे

ओबीसी जाती निहाय जनगणना   दडपण्यासाठी सीएए, एनआरसीचा उपयोग - कल्याण दळे


अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक विदर्भ कार्यकर्ता परिचय मेळाव्यात ते बोलत होते. 
 अमरावती 
- महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा अमरावती आयोजित नाभिक समाजाच्या विदर्भस्तरीय कार्यकर्ता  विदर्भस्तरीय कार्यकर्ता  मेळावा 25 जानेवारीला संपन्न झाला. यावेळी    प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा ओबीसीचे नेते मा. कल्याणराव दळे,  यावेळी म्हणाले की, देशात सीएए, एनआरसी सारख्या कायद्याचा उपयोग करून ओबीसी जातिनिहाय जनगणना दडपण्याचा केंद्र सरकारचा प्रकार सुरू आहे.  ओबीसी कल्याणासाठी नेमलेल्या रोहिणी आयोगाला वेळोवेळी केंद्र सरकारकडून मुदत वाढवून आतापर्यंत केंद्र सरकारकडून ओबीसींच्या  कल्याणाची भाषा करणारे सरकार, आता ओबीसी विकासाला खीळ बसण्याचे काम करीत आहे.  विकासाला आळा घालण्याचे काम. हे मोदी सरकार करीत आहेत. शेतकरी आत्महत्या प्रमाणे,  शेतकरी नसलेल्या   आत्महत्या   करणाऱ्यांना कुटूंबाला  मदत मिळाली पाहिजे. 
 बारा बलुतेदारांच्या पारंपारिक व्यवसायाला  लघु उद्योगाचा  दर्जा देण्याचे फडणवीस सरकारने घोषित केले होते. परंतु याची अंमलबजावणी झाली नाही. हे अत्यंत दुर्दैव  आहे.  श्री ठाकरे सरकारच्या  महा विकास आघाडी  शासनाने हा  प्रलंबित  प्रश्न तातडीने मार्गी लावला. अशी मागणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून ओबीसी व बारा बलुतेदारांचे  प्रश्न मार्गी लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर  समाजात विषेश अतिथी कल्याण दळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस,ओबिसी, बाराबलूतेदार नेते, प्रमुख मार्गदर्शक मा. कुमार काळे सर, दामोदर बिडवे, मा. शरद ढोबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद गंगात्रे, मा. बबनराव याधव, मा. धनराज वलुकर, मा. दिनेश एकवनकर, जिल्हा अध्यक्ष चंदपुर मह. ना. महा. मा संतोष मोपेवार, म. महा., मा. अरूण घोडसाड, सचिव वाशीम जिल्हा महा. मा राजेश लवनकर, सौ. भाग्यलता तळखंडे, नागपुर एकता मंच, सौ. शुषमा नांदुरकर, सौ. दिपाली बेलबागकर, यांची उपस्थिती होती.