गरम ताजा आहाराचा कंत्राट सर्व बचत गटांना द्यावा अन्यथा आंदोलन



चंद्रपूर - एकात्मिक बाल विकास ग्रामीण व शहरी प्रकल्प चंद्रपूर व बल्लारपूर मधील अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष मुलांना गरम ताजा आहाराचा पुरवठा यापूर्वी 2014 पासून एक एक अंगणवाडीचे आहार पुरवण्याचे काम बचत गटाला देण्यात आले होते. परंतु अचानक एकाच बचत गटाला पाच अंगणवाडीचे पोषण आहाराचे काम दिल्यामुळे बाकीच्या महिलां गटावर बेरोजगारीच्या खाईत ढकलण्याचे काम सरकारने केले आहे. अनेक महिलांचा संसाराचा गाडा हा या बचत गटांच्या गरम ताजा आहारातून सुरू होता. अचानक शासनाने 25 बचत गटांना पात्र यादीत समाविष्ट करून 124 बचत गट कार्यरत असताना यातील काही बचत गटांना अपात्र यादी टाकून बोळवण केल्याचा आरोप महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. जया जवादे तसेच बाकी महिला बचत गटाचे अध्यक्ष यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केला. जर प्रत्येक बचत गटांना गरम ताजा आहाराचा कंत्राट दिला नाही तर आम्ही धरणे आंदोलन करू अशी भूमिका बचत गटांच्या महिलांची केली आहे.