बावाची पकडलेली दारू लावारीस दाखविण्याचा महाकाली चौकी पोलीसांचा खटाटोप!

बावाची पकडलेली दारू लावारीस दाखविण्याचा महाकाली चौकी पोलीसांचा खटाटोप! 

माफियांची महाकाली पोलिस चौकीत सेट्टिंग? गुन्हा दाखल होणार कां? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरात  अवैध दारू विक्रीच्या धंद्यात मोठा पुरवठा करणारा दारू माफिया असून दररोज लाखों रुपयाची दारूची आवक याच्या माध्यमातून महाकाली कॉलरी परिसरात होत आहे,बागला पोलीस चौकी हद्दीत येत असलेल्या महाकाली कॉलरी ऐ-यातून
काल दिनांक ११ मार्चला रात्री ८,३० ला महाकाली कॉलरी कैण्टिंग चौका जवळ तब्बल ५५ देशी दारूच्या पेट्या पोलिसांनी जब्त केल्या होत्या मात्र या दारूच्या पेट्या असतांना सुद्धा व पोलिसांसोबत आरोपी गूप्तगू करीत असतांना सुद्धा आरोपीला पोलिस अटक करतांना दिसत नव्हते, याचा अर्थ पोलिस आरोपीला सोडून देवून पकडलेल्या दारूच्या साठय़ाला लावारीस असल्याचे दाखवणार असल्याचे दिसत आहे. हि कारवाई विषेेश पोलीस पथकाने केली मात्र दारू लावारीस असल्यायाचेे दाखवून प्रकरण दाबल्र्या जात  असल्याचे चर्चा सुरू आहे. स्टेशनचे पोलिस निरीक्षक बहादुरे यांनी अधिक चौकशी करून दारू माफिया भावा गुप्ता याला अटक करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.