भिवकुंड डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाला स्थगिती




भिवकुंड डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाला स्थगिती

चंद्रपूर :-   चिमूर तालुक्यातील भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. परंतु अचानक देशात कोरोना वायरसची झपाटय़ाने वाढ होत आहे.  कोरोना वायरसला रोखण्यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सर्व सामाजिक, तसेच ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते असा ठिकाणी एकत्र येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह तसेच दिनांक २१/३/2020 ला गोपाल काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु देशात कोरोना वायरस झपाटय़ाने वाढत असल्याने येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांसाठी काही दिवसासाठी मंदीर बंद करण्यात आले आहे. 
कृपया आपणास याची माहिती देण्यात येत आहे.
असे आवाहन आयोजकांनी केले आहे.