तिन दिवस महाराष्ट्रातील सलून दुकान बंद ठेवण्याचे आवाहन - कल्याण दळे
चंद्रपूर :- महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांत अध्यक्ष कल्याण दळे यांच्याकडून आज जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आपल्याला सर्वांना माहीत आहे की, आज देशातील परिस्थिती एका वायरस मुळे अतिशय नाजूक झाली आहे. कोरोना वायरस(कोव्हीड १९) याने संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजवला आहे. त्याचप्रमाणे भारतात व महाराष्ट्रामध्ये संशयित रुग्ण आढळले आहे. शासन स्तरावर या वायरस ला थांबवण्यासाठी बऱ्याच प्रमाणात हालचाली सुरू आहेत. परंतु आपणास शासनाच्या पाठीमागे उभे राहून आपल्यालाही या व्हायरसला थांबवणे गरजेचे आहे. हा व्हायरस शरीरातील स्पर्शाने, स्वासोस्वास द्वारा शरीरात प्रवेश करतो.
आपले सलून दुकानदार हे कित्येक लोकांच्या च्या संपर्कात येणारे माध्यम आहे. त्यातही काम करीत असताना ग्राहकाच्या एक फिट दूर लांब राहून समोरासमोर तोंड करून संपर्कात येत असतो. त्यामुळे या व्हायरसमुळे भविष्यात आपलेच बरीच लोक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, व राज्यातील जिल्हाध्यक्ष, विभागीय प्रमुख लोकांची चर्चा करून आपल्या बांधवांसाठी सर्वानुमते निर्णय घेतला आहे. जेणेकरून आपल्या बांधवांचा कोरोना वायरस पासून संरक्षण सुद्धा होईल. याकरिता आपण सर्वांना आवाहन व विनंती करण्यात येते की, दिनांक 21 मार्च ते 23 मार्च 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील सलून चे दुकान बंद राहतील.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे मातृ संघटना नसून महाराष्ट्रातील नाभिक समाज हा आपला परिवार आहे. आणिआणि कुटुंब प्रमुख या नात्याने हा माझा धर्म आहे, ती यामुळे माझा समाज या व्हायरसपासून दुर राहावा. आपणास आव्हान करतो की, दिनांक 21 मार्च 23 मार्च पर्यंत सर्व बांधव आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे. तसेच पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची ही असे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष कल्याण दळे यांनी समस्त महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांना आव्हान केले आहे.