शासनाने नाभिक सलून दुकानदार, कारागिरांना आर्थिक मदत द्यावी!





शासनाने नाभिक सलून दुकानदार,  कारागिरांना आर्थिक मदत द्यावी!

 सलुन दुकान बंद मुळे  नाभिक समाज संकटात! 

चंद्रपूर :- देशभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरस ला आळा घालण्यासाठी  केंद्रशासनाने  लॉकडाऊनचे  आदेश दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील करून दुकाने   दिनांक १९ मार्च पासून  बंद आहेत.  नाभिक समाज  हा रोजीरोटीसाठी रोजचा  व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारा समाज आहे. सलून चे दुकान बंद असल्याने आर्थिक  टंचाईमुळे उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. तर काहींना उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने म्हणून सलून दुकानदार, कारागीर यांना आर्थिक मदत करावी  अशी मागणी  महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर जिल्हा शाखा यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 राज्य सरकारच्या  आदेशानुसार सर्व जिल्ह्यातील विभागीय शहर,  तालुकास्तरावर सर्व सलून बल अशा सूचना देण्यात आल्या होत्या.  त्या आव्हानाला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला.  नंतरच्या घडामोडी   लाँगडाऊन  करण्यात आले.  आता ती मुदतही वाढली आहे.   यामुळे नाभिक समाजातील  सलून मध्ये काम करणारा  वर्ग   हा कोरोना मुळे सामाजिक,  आर्थिक  व मानसिक संकटाला सामोर जावे लागत आहे.  अनेक वेळा नाभिक समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेत.   सलुन दुकान बंद मुळे दुकानदार,  काम करणारा कारागीर वर्ग यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.  कोरोना वायरस  मुळे भयानक अशा संकटात सापडलेला नाभिक सलून वर्गाला राज्य शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी त्यांच्यामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर,  जिल्हा कार्याध्यक्ष माणिक चन्ने,  जिल्हा सचिव उमेश नक्षिणे,   बारा बलुतेदार जिल्हा कार्याध्यक्ष श्याम भाऊ राजूरकर,  सलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ हनुमंते,  शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार,  जिल्हा युवा अध्यक्ष सचिन नक्षीने,  कार्यकारिणी सदस्य बंटी कडवे,  प्रशांत पांडे आदींनी केले आहे.