कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक महाकाली यात्रेला प्रशासनाकडून स्थगिती




कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक महाकाली यात्रेला प्रशासनाकडून स्थगिती 



 राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वादता कामा नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 
दिनचर्या न्युज / चंद्रपूर : 


चंद्रपुर जिल्ह्यात आवश्यक उपाययोजनाचा आढावा घेण्याकरिता बैठक घेण्यात आली. जिल्हाधीकाऱ्यांच्या या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयक्त संजय काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता स.एन. मार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गेहलोत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



जगभरामध्ये सध्या कोरोना आजाराने थैमान घातले असन भारतात कोरोना वायरचे रुग्ण आढळले आहे. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक निर्णय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आठ खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
 चंद्रपूर जिल्ह्यात वर्तमानपत्रांमध्ये व सोशल माध्यमांवर कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती प्रसारित होत आहे. परंतु ते सत्य नाही. चंद्रपूर जिल्ह्यात अजून पर्यंत कोरोना रोगाचा संशयित रुग्ण अथवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, या आजारात भीती बाळगण्याचे कारण नसून योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. या रोगाची लागण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
यासाठी जिल्ह्यामध्ये ११ मार्च २०२० पासून आपत्त व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी या आजाराबद्दल कोणतीही अफवा पसरू नये.


जिल्ह्यात येणाऱ्या काळामध्ये कोणतेही सण, उत्सव साजरे करताना मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील काही कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी शक्यतो एकत्रित येण्यासाठीच्या असणाऱ्या कोणत्याही सण उत्सवात सहभाग टाळणे आवश्यक आहे. नाट्यगृह, सिनेमागृह याठिकाणी आणि या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे पुढील काही दिवस याबाबत गर्दीत जाणे टाळणे योग्य राहील.

 या आजाराचा प्रसार वरिष्ठ नागरिकांमध्ये झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी व सामान्य नागरिकांनी देखील पुढील काही काळात अनावश्यक प्रवास टाळणे योग्य राहील. हॉटेल, मॉल.बाजार, यात्रा, उरूस, जयंती, पुण्यतिथी व वाढदिवस स्नेहभोजन उत्सवाच्या कार्यक्रमांना आपापल्या स्तरावर काही प्रमाणात लगाम घालने अतिशय आवश्यक असून प्रत्येक कुटुंबाने यासंदर्भात जागरूक रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्रात नागपूर, पुणे व मुंबई या ठिकाणी विदेशातून येणाऱ्या नागरिकांना अनिवार्यपणे यासंदर्भातील तपासणीसाठी चौदा ते पंधरा दिवस आरोग्य विभागाचे निगराणी ठेवण्यात येते. त्यामुळे विदेशात जाणे अथवा विदेशातून येणे, थोडक्यात विदेशवारी या काळामध्ये टाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे

बस स्थानक, रेल्वे स्थानक, मंगल कार्यालय व गर्दाच्या अन्य ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता राखणे कोरोना आजाराचा प्रसार-प्रचार होण्यापासून मज्जाव करणे होय. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगावी, आरोग्य व स्थानिक यंत्रणेला यासंदर्भात कोणतीही अफवा असल्यास दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या शून्य आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेपो महत्वाचे आहे. कैद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय मुख्यमत्र्याना आज घतला आहे. त्यामुळे जिल्हयातील वण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यात येत आहे. यात्रा.
शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे. त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे, असे निर्देश देण्यात आले आहे आहेत. शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात लक्षणे आढळून आलेली नाही. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही.
परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली. ताडोबा येथे विदेशी पर्यटकांना प्रतिबंध घालण्याबाबत शासन विचार करत आहे. ताडोबामध्ये येणाच्या विदेशी पर्यटकांच्या तपासणी बाबतही सूचना दिल्या असून त्यावर निगराणी ठेवली जात आहे.
चंद्रपूर शहरातील टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली पाहिजे. जे पर्यटक परतणार आहे त्यांनी स्वत:हून घरीच १५ दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


राज्यस्तरावर याबाबत दर दोन तासांनी आढावा घेतला जात आहे. चीन, इराण, इटली, द.कोरिया.फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहे त्यांना सक्तीने १५ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना राज्यभर देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे १०० टक्के क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर व परिसरात कोणी विदेशातून आल्यास त्याची माहिती योग्यप्रकारे जिल्हा प्रशासनाला द्यावी अशी सूचना देखील करण्यात आली आहे.
जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा.
 पुढील किमान १५ ते २० दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत सर्व संस्थांना विनंती करण्यात येत आहे.
जनतेने कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रथम प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी व एखादी व्यक्ती काराना क्षत्रातून आला असेल किंवा अशा प्रकारचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपर येथे तात्काळ संपर्क साधावा तसेच राज्य संपर्क कक्ष दूरध्वनी क्रमांक 02026127394 टोल फ्री क्र. 104 वर संपर्क साधावा. जिल्हयासाठी 071/ 253275 हा क्रमांक 24 तास सुरु ठेवण्यात आला आहे.