चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही !एबीपी माझा ची ती बातमी चंद्रपूरची नव्हे ?

एबीपी माझा ची ती बातमी चंद्रपूरची नव्हे ? चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही !


चंद्रपूर जिल्ह्यात एबीपी न्यूज च्या बातमीने जनतेत भीतीचे वातावरण ? स्थानिक एबीपी माझा चे प्रतिनिधी सारंग पांडे यांच्या मते ती बातमी मंत्रालयातून ? 


चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी एबीपी  माझा वर झळकताच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमधे भिती निर्माण झाली असून जो तो आपल्या जिल्ह्यातील तो कोरोना रुग्ण कोण ? तो कुठे आहे ? त्याला खरंच कोरोना झाला कां ? याबाबत नागरिक चर्चा करतांना दिसत असून अलिकडेच  चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्यामुळे काही बाबतीत जिल्ह्यात संचारबंदीमधे स्थितिलता आणू अशी घोषणा केली होती, मात्र एबीपी  माझा च्या या बातमीमुळे प्रशासन सुद्धा खळवळून जाग झालं मात्र जिल्हाधिकारी किंव्हा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या तर्फे या बातमीला दुजोरा अजूनपर्यंत दिला गेला नाही, एवढेच नव्हे तर जिल्हा सामान्य रुग्णालयात चौकशी केली असता असा कुठलाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भरती नसल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणीतून समोर आले आहे.

या संदर्भात एबीपी  माझा चे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सारंग पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बातमी मंत्रालयातून देण्यात आल्याचे म्हटले आहे, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जणतेने घाबरून जाऊ नये व जोपर्यंत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या तर्फे अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.