बल्लारपूर शहरात एक पॉझिटिव्ह चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या १४ वर

*चंद्रपूर कोरोना अपडेट*


*बल्लारपूर शहरात एक पॉझिटिव्ह*

चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या १४ वर

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार आज दुपारी बल्लारपूर येथील ३७ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोहचला होता. या व्यक्तीला आला त्याच दिवसापासून संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज 23 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णासोबतच जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्णाची संख्या 14 झाली आहे.
तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील एक युवतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
23 मे ला दुपारी ४ वाजता आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 14 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 14 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .

दिनचर्या न्युज