आज १९ जुलै रोजी १६ बाधित,
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २७६
मूल येथील राईस मीलमधील आतापर्यत १४ कामगार पॉझिटीव्ह
राज्य राखीव पोलीस दलाचे आत्तापर्यंत १९ जवान पॉझिटीव्ह
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या ११७
१५९ बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर,दि. १७ जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या २७६ बाधितांपैकी १५९ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर ११७ जणांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत. या बाधितामध्ये ३ जण अॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा समावेश आहे. अनुक्रमे ५० व २५ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती. यापूर्वी १२ कामगार व एक चालक असे एकूण १३ जण पॉझिटीव्ह ठरले होते. आज दोन कामगारांमुळे एकूण १४ कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत.
बिहार राज्यातील आणखी एक व्यवसायाने चालक असणारा ४५ वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी रेल्वेने आल्यानंतर बिहार येथूनच आलेल्या एका चालकाच्या संपर्कात आल्याने तो पॉझिटिव्ह झाला आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीमधील आणखी तीन जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत. जोखमीच्या संपर्कातील असणारे अनुक्रमे २७, २८ व ३१वर्षीय जवान संस्थात्मक अलगीकरणात होते. १६ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये तीन जवान पॉझिटिव्ह ठरले आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असलेले यापूर्वी 16 जवान पॉझिटिव्ह ठरले होते. आत्तापर्यंत एकूण 19 जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत.
राजुरा ब्राह्मणवाडा येथील 32 वर्षीय युवक हैद्राबाद वरून आला होता. संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.
कोरपना तालुक्यातील पालगाव फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या चेन्नई वरून परत आलेला 30 वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.
गडचांदूर येथील वार्ड क्रमांक चार मधील रहिवासी असणाऱ्या 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमरावती वरून परत आल्यानंतर संस्थात्मक ऐवजी गृह अलगीकरणात होता.
विदेशातून आलेल्या चंद्रपूर येथील गाडगेबाबा चौक बाबुपेठ परिसरातील एका युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. विदेशातून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरण होता.
वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. मुंबई येथून आल्यानंतर दोघेही ही संस्थात्मक अलगीकरणात होते. 17 जुलै रोजी घेण्यात आलेले यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
बंगळूरवरून परत आलेला चंद्रपूर येथील 35 वर्षीय रयतवारी कॉलनी चंद्रपूर येथील नागरिक आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. त्यांचा देखील नमुना पॉझिटिव्ह ठरला आहे. याशिवाय बाबुपेठ परिसरातील ५७ वर्षीय जोखमीच्या संपर्कातील नागरिकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पालगाव येथील नागरिक असणारे सैन्यदलातील जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. ११ तारखेला चेन्नई येथून आगमन झाल्यानंतर काल स्वॅब घेण्यात आल्यावर बाधित असल्याचे आढळून आले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील एका परिवारातील चार वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातून प्रवास केला होता. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 17 तारखेला बालिकेचा नमुना घेण्यात आला होता. आज ती पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.
जिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित ) १८ जुलै ( एकूण १७ बाधित ) व १९ जुलै ( एकूण बाधित १६ ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित २७६ झाले आहेत. आतापर्यत १५९ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २७६ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ११७ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.