आ मुनगंटीवारांच्या पुढाकारातून पत्रकार भवन व माहिती सुविधा केंद्र झाले सज्ज.






आ मुनगंटीवारांच्या पुढाकारातून पत्रकार भवन व माहिती सुविधा केंद्र झाले सज्ज.*

*महापौर व उपमहापौरांनी केली पाहणी.*

दिनचर्या न्युज

*चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका,नागपूर रोड येथे आ सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या नवीनतम "पत्रकार भवन व माहिती सुविधा केंद्राची आज शुक्रवार (२८ ऑगस्ट)ला महापौर राखी कांचर्लावार व उपमहापौर राहुल पावडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.*
*यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता श्रीकांत भट्टड,नगरसेवक रवी आसवाणी,चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष संजय तुमराम, सरचिटणीस प्रशांत विघ्नेश्वर,मजहर अली,आशिष अंबाडे,महेंद्र ठेमस्कर,जितेंद्र माशारकर,देवानंद साखरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.*
*यावेळी चर्चा करताना महापौर कांचर्लावार म्हणाल्या,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री व पालकमंत्रीपदाच्या काळात चांदा ते बांदा विकासाची योजना आखण्यात येऊन समग्र विकास करण्यात आला.त्यासाठी सर्वस्तरावर नियोजन करून निधी उपलब्ध करून दिला.यातील बरीच कामे आज ही सुरू आहेत.त्यातील २कोटी रुपयांचे पत्रकार भवन,माहिती सुविधा केंद्र पूर्ण झाले. येथे पत्रकारांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका असावी हे स्वप्न त्यांचे आहे.या भव्य इमारती मधील प्रशस्त पत्रकार भवन,माहिती व सुविधा केंद्र आणि नियोजित अभ्यासिका निश्चितच सर्वांच्या उपयोगाची असेल,असेही त्या म्हणाल्या.*
*उपमहापौर राहुल पावडे यांनी संपूर्ण बांधकामाचे निरीक्षण करून,आवश्यक सूचना करीत,ही वास्तू महानगराच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे सांगत,पत्रकार बंधूंच्या सोबत आपण नेहमीच आहोत ,असे ते म्हणाले.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील अभ्यासिका लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील,असे ते म्हणाले.*