24 तासात 303 बाधिताची नोंद ; दहा बाधितांचा मृत्यू.






चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 7279

24 तासात 303 बाधिताची नोंद ; दहा बाधितांचा मृत्यू

4106 कोरोनातून बरे ;3068 वर उपचार सुरू

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 303 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 279 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 106 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 68 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात 24 तासात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, रामनगर, चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू पायली भटाळी, ताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू विचोडा, चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सहावा मृत्यू महाकाली कॉलनी परिसर, चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सातवा मृत्यू कळमना, बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

आठवा मृत्यू भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

नववा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, दहावा मृत्यू जटपुरा गेट परीसर, चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या दहा मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 105 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 98, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 126, कोरपना तालुक्यातील 12, गोंडपिपरी तालुक्यातील 6, नागभीड तालुक्यातील 3, पोंभुर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 29, ब्रह्मपुरी तालुक्यातील 49, भद्रावती तालुक्यातील 22, मुल तालुक्यातील 15, राजुरा तालुक्यातील 6, वरोरा तालुक्यातील 18, सावली तालुक्यातील 13, सिंदेवाही तालुक्यातील 2, वणी यवतमाळ येथील एक असे एकूण 303 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील एकता नगर, बापट नगर, बालाजी वार्ड, सरकार नगर, कोतवाली वार्ड, जटपुरा गेट परिसर, लक्ष्मी नगर वडगाव, रामनगर, अजयपुर, सम्राट अशोक नगर, एकोरी वार्ड, भानापेठ वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, कृष्णा नगर, इंदिरा नगर, म्हाडा कॉलनी परिसर, दादमहल वार्ड, ऊर्जानगर, सरकार नगर, समाधी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

राजुरा तालुक्यातील गांधी चौक परिसर, चुनाभट्टी परिसर, सास्ती, कुरली परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील गांधी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, बालाजी वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, कन्नमवार चौक परिसर, गौरक्षण वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातून विद्यानगर, शेष नगर, भिकेश्वर, जानी वार्ड, कृष्णा कॉलनी परिसर, खेड, सौंदरी, गांधी चौक परिसर, पटेल नगर, गांधिनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील गुरूनगर, गणेश मंदिर परिसर, नंदोरी, राधाकृष्ण कॉलनी परिसर,गांधी चौक, माजरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड, माढेळी, अभ्यंकर वार्ड, बावणे लेआऊट परिसर, ज्योतिबा फुले वार्ड, वैष्णवी नगर, बोर्डा, मोहबाळा, परिसरातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील चिरोली, पळसगाव, चिचाळा, वार्ड नंबर 17 मुल या भागातून बाधित ठरले आहे.

00000