चंद्रपूर
अंदाजे 50 ते 55डॉक्टरांना चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची लागण!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर शहरात कोरोना चा समूह संसर्ग सुरू झाला आहे . प्रत्येक घराच्या दरवाज्यावर कोरोना उभा आहे . या रोगाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी अधिकाधिक चाचण्या वाढवा अशी सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहे . मात्र “कॉन्टॅक्ट ट्रेस” होत नाही. या एका सबबीखाली प्रशासनाकडून सरसकट ऑटीजेन चाचण्याला मनाई करण्यात आली आहे. सरसकट चाचणी केली जात नसेल तर खाजगी लॅबचालकांना परवानगी दिलीच कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.. चंद्रपूर शहरात कोरोना च्या समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून जवळपास 50 ते 55 डॉक्टर या रोगाने बाधित झाले आहे . त्यामुळे शहरातील खाजगी डॉक्टर यंत्रणा पूर्णत कोलमडून पडली आहे . तर तीन 3 डॉक्टर नागपुरात खाजगी उपचार घेत आहेत .आणखी तीन 3 डॉक्टर ला नागपूरला हलविण्याची तयारी सुरू आहे . मात्र बेड उपलब्ध होत नसल्याने सध्या त्यांच्यावर चंद्रपुरात उपचार सुरू आहे .गंभीर बाब म्हनजे ज्या डॉक्टरांचे रुग्णालय कोविडं हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आले आहे . तिथल्याच डॉक्टरांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे .ही विस्फोटक स्थिती पाहता खाजगी आरोग्य यंत्रणा सुद्धा हादरून गेली आहे. .जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाजगी रुग्णालयात ओपीडी घेतल्या जात नसून डॉक्टर फोनवरूनच रुग्णांची दवाई देत आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये साथीचा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यात या कोरोना मुळे अनेक रुग्ण उपचाराविनाच तळफळत आहेत. या कोरोनाने आता प्रत्येकाचे दार उघडण्याचे ठरवले आहे. तरी आपण "माझे कुटुंब - माझी जबाबदारी"समजून सतर्कता बाळगावी.