परीट / धोबी महासंघाचे राज्यभर आंदोलन, महाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यभर जाहिर पाठिंबा.
आज परीट / धोबी महासंघाचे राज्यभर आंदोलन
महाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यभर जाहिर पाठिंबा.

पांडुरंग भवर ,प्रदेश सरचिटणीस
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई यांनी राज्यभर तर गजानन वाघमारे यांनी विदर्भ स्थरावर परिपत्रक काढून कार्यकर्ते यांना केले आवाहन

अकोला ---परिट/धोबी समाजाने दि ४ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या आंदोलनाला ऑगस्ट २०१९ मध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातिमधे समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र सरकार कडून केंद्र सरकारकड़े शिफारस करण्यात आली होती . त्यानुसार केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्येच राज्य शासनाला पत्र पाठवून धोबी समाजाच्या आरक्षणा संबंधी केंद्र सरकारच्या २००५ च्या परिपत्रकानुसार विहित नमुन्यात माहिती मागितली परंतु ११ महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी राज्य शासनाने केंद्र सरकारला अद्यापपर्यंत माहिती पाठविलेली नाही. त्याचसाठी महाराष्ट्रराज्य सर्वभाषिक परीट धोबी महासंघाने ४ सप्टेंबर २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधे आंदोलन उभे केलेले आहे. त्या आन्दोलनाला महाराष्ट्र नाभिक महामंडळचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार पांडुरंग भवर ,प्रदेश सरचिटणीस
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई यांनी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत विदर्भ अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी परिपत्रक काढून कार्यकर्ते यांना पाठींबा पत्र लिहून देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 
नाभिक समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा घोषित केला आहे  धोबी समाजाची आरक्षणा संबंधीची माहिती केंद्र सरकारला पाठवून धोबी समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी करून आपल्या समाजाच्या सर्व कार्यकर्ते यांना  जिल्हावार  पाठिंबा देण्याचे आदेशीत केले आहे. 
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री संजय भट्टी अध्यक्ष अकोला जिल्हा श्री अविनाश भुतेकर अध्यक्ष बुलढाणा श्री सुभाषराव मानेकर अध्यक्ष अमरावती श्री गुड्डूभाऊ नक्षने यवतमाळ श्री नामदेवराव सुरेकर वाशिम, चंद्रपूर अध्यक्ष दिनेश एकवनकर, यांनी पाठिंबा दिला आहे.