चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार विरोधात आंदोलन




चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार विरोधात आंदोलन*

कांदा निर्यात बंदी तात्काळ रद्द करा:बेबीताई उईके ची मागणी

दिनचर्या न्युज :-

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्याने *राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके* यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
तीन महिन्यापूर्वीं दिनांक ४ जून २०२० रोजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती .मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला? त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करू शकत नाहीत .नरेंद्र मोदींना धोरण लकवा झालेला दिसत आहे .कांदा हे पिक वगळले होते. मात्र तीन महिन्यातच कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालून शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. लाॅकडाऊन च्या अतिशय संकट काळात मोठ्या कष्टाने शेतकर्याने कांदा पिकवला होता. दोन तीन दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. तेवढ्यात केंद्र सरकारने कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी घोषित केली यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल अशी भिती राष्ट्रवादी महिला काँगेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी व्यक्त केली आहे.
*कोरोना रोगा सारख्या महाभयंकर संकटात स्वताःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्याने लोकांसाठी भाजीपाला पिकवून शहरातील नागरिकांना अन्न धान्यांची सोय उपलब्ध करून दिली.* शेतकर्याने पिकवलेला कांद्याला दोन दिवसापासून चांगला भाव मिळायला लागला तेवढ्यात कांद्यावर निर्यात बंदी घालून बळीराजाच्या तोंडातला घास केंद्र सरकारने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. *भविष्यात यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भिती देखील वाटते. तेव्हा केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी*.
जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार हाय हाय*
*कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्या, मागे घ्या.शेतकरी टिकेल तर शेती पिकेल, शेतकऱ्याची लुट हेच मोदी सरकारची भूक ,कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ हटवा,केंद्र सरकार शेतकरी विरोधी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो* अशा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सव्वा किलो कांदा भेट देऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान मा .नरेंद्रजी मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले
निवेदन देतांना यावेळी उपस्थित *राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हा सचिव शोभा घरडे राणी रॉय रंजना नागतोडे माधुरी पांडे सुमित्रा  वैध प्रतीक्षा अलोने सारिका धोबे अर्चना कामतकर शालिनी वैद्य सुरेखा ठाकरे रुपाली नेरकर उषा  सहारे अन्य महिला उपस्थित उपस्थित होत्या.




दिनचर्या न्युज