आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने लवकरच शहरात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ स्‍टेडियम साकारणार – डॉ. मंगेश गुलवाडे




आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने लवकरच शहरात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ स्‍टेडियम साकारणार – डॉ. मंगेश गुलवाडे


भाजपा महानगर शाखेतर्फे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली अर्पण.

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन करावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्‍या स्‍तरावर प्रभावी पाठपुरावा करून त्‍यात यश मिळविले. आदिवासी समाजबांधवांच्‍या हिताचे रक्षण करण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, मुल, पोंभुर्णा येथे आदिवासी मुलामुलींसाठी वसतीगृहांची बांधकामे मंजूर करविली. मिशन शौर्यच्‍या माध्‍यमातुन आदिवासी विद्यार्थ्‍यांची यशस्‍वी माऊंट एवरेस्‍ट स्‍वारी घडविली. पोंभुर्णा तालुक्‍यामध्‍ये आदिवासी महिलांसाठी राज्‍यातील पहिली महिला कुक्‍कटपालन संस्‍था त्‍यांनी स्‍थापन केली. आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर शहरात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मृत्‍यर्थ स्‍टेडीयम उभारण्‍याचा त्‍यांचा संकल्‍प आहे. या संकल्‍पाची पूर्तता सुध्‍दा लवकरच होईल असे प्रतिपादन भाजपाचे महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.

दिनांक 21 ऑक्‍टोबर रोजी क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्‍या शहीद दिनानिमीत्‍त भाजपातर्फे जिल्‍हा कारागृह परिसरात आदरांजली अर्पण करण्‍यात आली. यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, मनपातील भाजपा गटनेते वसंत देशमुख, भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, संदीप आगलावे, राजेंद्र खांडेकर, राजकुमार आक्‍कापेल्‍लीवार, दयाल कन्‍नाके, एकनाथ कन्‍नाके, सुनिल डोंगरे, पुनम तिवारी, सज्‍जाद अली, क्रिष्‍णा मेश्राम, नामदेव कन्‍नाके आदींची उपस्थिती होती. यावेळी बाबुरावजी शेडमाके अमर रहे अशा घोषणा देत भाजपा पदाधिका-यांनी त्‍यांच्‍या स्‍मृतीस अभिवादन केले.