डॉ.रवी धारपवार आंतरराष्ट्रीय स्तरावरील सलग तीन पुरस्काराने सन्मानित

डॉ.रवी धारपवार
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सलग तीन पुरस्काराने सन्मानित.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपुर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे ,'लोकप्रशासन अभ्यास मंडळा'चे अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ.रवी
धारपवार यांनी कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'डिस्टीग्वीश प्रोफेसर फाँर प्रोव्हायडींग ईफेक्टीव्ह ऑनलाईन क्लासेस 2020', हा पुरस्कार देवून आंतरराष्ट्रीय शिक्षण समिती मार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.या पुरस्कारासाठी विविध वीस देशातील प्राध्यापकांनी नामांकन दाखल केले होते. त्यामध्ये डॉ.रवी धारपवार यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी कोरोना काळात विविध विषयांवरील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार,कॉन्फरन्सचे व वर्कशॉपचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी देशविदेशातील प्राध्यापकांकडून संशोधन लेख मागविले.सदर संशोधनलेख हे यूजीसी रेफर्ड जर्णल तसेच यूजीसी केअर लिस्ट जर्णल्स मध्ये प्रकाशित करण्यात आले. यूजीसी रेफर्ड जर्नल्समध्ये 6 खंड प्रकाशीत केले.या खंडांचे संपादनही डॉ.धारपवार यांनी केले. तसेच यूजीसी केअर लिस्ट 2 खंड प्रकाशीत करून त्यामध्येही संपादकाची भुमिका पार पडली.कोरोना काळात संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आवश्यक मानल्या जाणाऱ्या यूजीसी केअर लिस्ट जर्नलमध्ये तथा इंडेक्स रेफर्ड जर्नल मध्ये पेपर प्रकाशित करण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी या काळात केले.या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून लघु व कुटीर उद्योग मंत्रालय, भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त व रजिस्टर संस्था इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर या संस्थेद्वारे त्यांना 'रिसर्च एक्सलंट अवार्ड' व 'आंतरराष्ट्रीय शिक्षण पुरस्कार 2020' देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व त्यांना आशिया खंडातील वेगवेगळ्या समितीचे व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर चे कायम सभासदत्व देन्यात आले. याशिवाय आशिया इंटरनॅशनल एज्युकेशन समितीचेही कायम सभासदत्व त्यांना प्राप्त झाले आहे.त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना ,'रिसर्च एक्सलंट तथा डीस्टीग्वीषश प्रोफेसर अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळामध्ये नागपूर,अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांपैकी 'वन वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम'चे आयोजन करणारे एकमेव महाविद्यालय म्हणून चिंतामणी महाविद्यालय,घुग्घूसला डॉ. धारपवार यांनी सर्वप्रथम पुढाकार घेन्याचा मान मिवून दिला आहे.या द्वारे त्यांनी प्राध्यापकांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या. कोरोना महामारी च्या काळामध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी विविध पद्धतीच्या तंत्रांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवणे उपलब्ध करून देणारी तसेच प्राध्यापकांच्या उजळणी वर्ग तसेच प्राध्यापकांच्या विविध विषयांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार,कॉन्फरन्स व वर्कशॉप यांची यशस्वीपणे आयोजन करून प्राध्यापकांमध्ये डेव्हलपमेंट घडवून आणन्याचे सातत्याने प्रयत्न करणारे डॉ. धारपवार यांना डीस्टीग्वीश प्रोफेसर म्हणून सन्मानित करण्यात आले. डॉ. धारपवार यांचा नुकताच एक ग्रंथही प्रकाशित झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या चार विद्यार्थी पीएचडी पदवीसाठी संशोधन करीत आहेत. याशिवाय त्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर 22 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.हे शोधनिबंध  विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत.गोंडवाना विद्यापीठा मध्ये लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते
विविध जबाबदाऱ्या आजपर्यंत यशस्वीपणे पार पडत आहेत. महाविद्यालय व संस्थेच्या स्तरावर त्यांच्या बहुमूल्य कार्याची दखल घेवून संस्थेच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी वसंतराव दोंतुलवार व सचिव,श्री स्वप्नीलजी वसंतराव 
दोतुलवार यांनी त्यांचे कौतुक करून संस्था स्तरावरील 'आउट स्टँडिंग परफॉर्मन्स अवार्ड' त्यांना बहाल केला.संस्थेचे सदस्य प्रा. मनीष पोतनुरवार, सिनेट सदस्य प्राचार्य,प्रशांतजी दोंतुलवार, प्राचार्य, डॉ. चंद्रशेखर कुंभारे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. 
धारपवार यांचे अभिनंदन करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.