ओबीसीचा खरा नेता गोपीनाथ मुंडे नंतर विजय वडेट्टीवारच्या रूपाने मिळाला - कल्याण दळे
प्रतीनिधी
दिनचर्या न्युज :-
अहमदनगर :- येथे ओबीसी, बारा बलुतेदार महासंघाचा मेळावा 26 डिसेंबर ला आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रजा लोकशाही परिषद व बाराबलूतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा ओबीसीचे नेते मा. कल्याण दळे म्हणाले की,
बारा बलुतेदारांना सर्व क्षेत्रात संधी द्यावी, राज्यात एकही मंत्री हा विधानपरिषदेत ओबीसीचा नाही. बारा बलुतेदारना या पुढे संधी मिळाली पाहिजे. ओबीसीचे खरे आरक्षण हे 27%असताना ते शुध्दा 17 %वर आणून ठेवले. यातील एक टक्काही आरक्षण हे मराठ्यांना जाता कामा नये. आणि हे ओबीसी, बारा बलुतेदार खपवून घेणार नाही. आपण बहुजन, ओबीसी खात्याचे मंत्री आहात सर्वांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली पाहिजे. गोपीनाथ मुंडे नंतर खरा नेता हा विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. तो वारसा आपण चालवला पाहिजे.
बारा बलुतेदारना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून काम केले पाहिजे, या जातीतील गरिब मुलांना शिक्षण देण्याचे काम कराव. आपण मंत्री असाल किंवा नसाल तरी हा ओबीसी, बारा बलुतेदार आपल्या सोबत राहील असे ते म्हणाले .
या मेळाव्याचे अध्यक्ष ओबीसी नेते बाळासाहेब सानप, महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा ओबीसी ना. विजय वडेट्टीवार, प्रजा लोकशाही परिषद, बारा बलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा ओबीसी नेते मा.श्री.कल्याण दळे, लक्ष्मण हाके, बालाजी शिंदे, वि. डी. चव्हाण, साधना राठोड, सोमनाथ काशिद, अशोक सोनवणे, अंबादास पचाडे, बाळासाहेब भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
घटनेने दिलेल्या ओबीसी चा हक्क टिकवायचा असेल तर सर्व ओबीसींनी एकत्रित याव. जात हा विषय नाही,तरच तुम्ही राज्यकर्ते व्हाल, पद आज आहे, उद्याचे कोणाला माहित, मात्र मला मिळालेल्या पदाचा उपयोग ओबीसीला न्याय देण्यासाठी केला तरच जनतेच्या मनात मी कायम राहील, असे प्रतिपादन बहुजन विकास मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले की, ओबीसी साठी छगन भुजबळ यांच्या पुढाकार मोठा आहे. तर मि गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा घेऊन ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मि लढण्याची तयारी आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्राने ही मागणी स्विकारली नाही. तर राज्य सरकार ओबीसीची जनगणना करेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. प्रत्येक समाज एक झाल्याशिवाय ओबीसीचे भवितव्य नाही. पुढची पिढी बरबाद होण्याची भीती आहे. बारा बलुतेदारांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काळात नाभिक समाजातील 15 आत्महत्या घडल्या त्याना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. असे ही या वेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने करण्यात आले होते.