महिला बचत गट व नगरसेविका मंगलाताई आखरे यांच्यावतीने कोरोना योध्दाचा सन्मान







महिला बचत गट व नगरसेविका मंगलाताई आखरे यांच्यावतीने कोरोना योध्दाचा सन्मान

चंद्रपूर:- दिनचर्या न्युज
मातानगर चौक, भिवापूर वार्डात 26 जानेवारी 2021 ला 72 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिला बचत गट व माता नगर वार्डातील नगरसेविका मंगलाताई आखरे यांच्या तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपाचे उपायुक्त विशाल वाघ हे होते. तर सत्कारमूर्ती म्हणून तसेच प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी म्हणून बोहरा समाजाचे आरिफ हुसेन, युजर शाफीवाला, दिनचर्या चे संपादक दिनेश एकवनकर, सिटी न्यूज पत्रकार विकास मोरेवार,  मनपा प्राथमिक शाळेच्या  शिक्षिका सौ.  वासेकर  मॅडम,  मंचावर या कार्यक्रमाचे आयोजक  नगरसेविका सौ मंगलाताई आखरे,  माजी नगरसेवक राजूभाऊ आखरे,  शंकर बल्लेपवार  नंदु मेश्राम पत्रकार, यांची उपस्थिती होती.
 देशात मार्च मध्ये  कोरोना ने मोठ्या प्रमाणात थैमान घातला.  संपूर्ण देशामध्ये  लाँगडाऊन  करण्यात आला. अशा काळातही डब्ल्यू एच ओ यांनी नियमाचे पालन करत. संपूर्ण शहरात गरजवंतांना त्याच्यापर्यंत प्रत्येक सुविधा  कशा पोहोचवता येतील  साठी मनपाचे कर्मचारी,  आरोग्य सेवक,  आशा वर्कर,  घंटा गाडी घेऊन घरी जाऊन कचरा सफाई कामगार यांनी यावेळी  मोलाचे योगदान दिले आहे.  तसेच पोलीस विभाग,  पत्रकार,  यांनीही कोरोना  काळात  आपले योगदान दिले आहेत. या सर्वांचे महिला बचत गटाच्या वतीने कोरोना  योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.  बोहरा समाजाच्या वतीने संपूर्ण चंद्रपूर शहरात भोजनाचे वाटप करण्यात आले.  त्यांचे खास करून यावेळी  मनपाचे उपायुक्त वाघ साहेब यांनी आभार मानले.  चंद्रपुरातील अनेक सामाजिक संघटनांनी कोरोना  काळात  आपापल्या परीने भरीव योगदान दिले.  या कार्याची जाणीव ठेवून माता नगर वार्डातील नगरसेविका मंगलाताई आखरे  यांनी आपला सर्वांचा सन्मान केला. असे मत उपायुक्त वाघ साहेब यांनी मानले. तसेच बोहरा समाजातील  हुसेन भाई त्यांनी म्हटले की आपल्याकडे द्या घंटागाडी वाल्या येतात त्यांना कचरेवाली न समजता,  त्यांना सन्मानपूर्वक सफाई वाले अशा प्रकारचे संबोधले गेले पाहिजे.  कारण कचरा आपण जमा करतो आणि त्या आपण करण्याचे काम करतात. यावेळी  मनपा3 झोनमधील घंटागाडी वाल्या 32 महिलांचा साडी-चोळी देवून गौरविण्यात आले , नऊ पुरुष , आशा वर्कर , मनपाच्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी,4 परिचारीका,    पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.
 या सत्कार कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी वार्डातील किशोर रायपूरकर, बंटी ईसगलाला, राजू लंगाबेंदी, श्रावण कल्लापेल्ली, कमलेश ठाकरे, बौध्दीत्व चुनारकर, प्रशांत बेले, रोषन सलोटे, नाजीम शेख, सुलतान कुरेशी, तसेच वार्डातील महिला पुरूष यांची उपस्थिती होती.