तुकूम परिसरातील पिडीत तरूणीला न्याय द्यावा अन्यथा आंदोलन – अंजली घोटेकर
दिनचर्या न्युज चंद्रपूर :-
दिवसेंदिवस महिलांना अत्याचार हे वाढतच आहे. अशीच एक घटना चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील एका महाविद्यालयीन तरूणीला निर्जनस्थळी नेऊन तिच्या प्रियकराने अमानूष मारहाण केल्याप्रकरणी भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष सौ. अंजली घोटेकर यांनी दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी ठाणेदार श्री. स्वप्नील धुळे यांच्याशी झालेल्या चर्चेत सौ. अंजली घोटेकर म्हणाल्या, मारहाणीच्या वेळी सदर तरूणी अडीच महिन्याची गर्भवती होती. प्रेमप्रकरणातून तिला दिवस गेले. सदर तरूण लग्नासाठी नकार देत असल्याने हा प्रकार घडला. निर्जनस्थळी बोलवून आपल्या चार मित्रांच्या मदतीने तरूणाने तिला अमानूष मारहाण केली त्यात ती बेशुध्द झाली. पिडीत तरूणी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल झाल्यानंतर तिचे बयाण घेण्यात आले. याप्रकरणी पिडीत तरूणीला न्याय मिळावा व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अंजली घोटेकर यांनी केली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर तसेच दुर्गापूर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा अंजली घोटेकर यांनी दिला आहे. यावेळी नगरसेविका व महिला मोर्चा महामंत्री सौ. शिला चव्हाण, उपाध्यक्ष सौ. प्रभा गुडधे यांची उपस्थिती होती.