ब्रेकिंग न्युज :- राजुरा येथे राजू यादव यांची अज्ञात इसमांनी सलून मध्ये गोळ्या झाडून केली हत्त्या.

ब्रेकिंग न्युज :- राजुरा येथे राजू यादव यांची अज्ञात इसमांनी सलुन मध्ये गोळ्या झाडून केली हत्त्या.

बल्लारपूर येथील सूरज बहुरीया यांच्या हत्तेची पुनरावृत्ती, जिल्ह्यात ग्यांगवॉर वाढली?

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्ह्यात जणू माफिया राज निर्माण झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून पत्रकारांवर हल्ले होत असताना आता ग्यांगवॉर होऊन खुलेआम गोळ्या झाडून कुणाचीही हत्त्या करण्याच्या घटना जिल्ह्यात गुंडाराज असल्याची पावती आहे अशीच एक दर्दनाक व खळबळजनक घटना राजुरा येथे घडली असून राजुरा येथील एका हेअर सलून मधे उपस्थित असलेल्या कोळसा व्यापारी व वेकोलि ट्रक चालक-मालक अससोसिएशन राजुरा -बल्लारपूर चे अध्यक्ष राजू यादव (45)रा. रामपूर यांना दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली, ही घटना आज 31 जानेवारी ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान सलून दुकानात घडली असून यात राजू यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पोलिसांचा दस्ता घटनास्थळी पोहचला असून आरोपी यांचा शोध सुरू आहे.

काही महिन्यापूर्वी बल्लारपूर येथे सूरज बहुरीया यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्त्या केली होती त्याची शाई वाळत नाही तोच आता राजुरा येथे आज झालेल्या गोळीबारात कोळसा व्यपारी राजू यादव याची झालेली हत्या चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा फज्जा उडविनारी ठरत आहे.