चिमूर तालुक्यातील मनरेगा कामातील भ्रष्ट्राचार प्रकरणी कार्यवाही केव्हा होणार?




चिमूर तालुक्यातील मनरेगा कामातील भ्रष्ट्राचार प्रकरणी कार्यवाही केव्हा होणार?

पंचायत राज समितीचा दौरात चौकशी होईल का?

दिनचर्या न्युज :-

चिमूर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात मनरेंगा योजनेतील पांदण रस्ते ,रेती मुरूम पुरवठ्यात बोगस बिले,बोगस टिप्या दाखवून , यासह इतर कामात गैरव्यव्हार झाला असून लाखो रुपयांची देयके उचलून पुरवठादार,ग्रामसेवक , सरपंच व रोजगार सेवक आणि या यंत्रणेतील अधिकारी यांनी सनगमतांनी लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचे दिसून आले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची जिल्हा स्तरीय समिति कडून चौकशी करून अहवालनंतर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तत्कालीन चिमूर चे बीडीओ व्ही बी जाधव लेखापाल विशाल वासलवार यांचे सह चिचाळा शास्त्री, मदनापूर पुयारदंड,गडपिपरी,खानगाव ,मानेमोहाळी या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाना कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यावेळी १५ डिसेंबरला साहाय्यक लेखाधिकारी विशाल वासलवार यांना निलंबित केल्याचे आदेश झाल्यानंतर ईतर कर्मचाऱ्यांच्या कार्यवाहीचे काय झाले कारवाही कडे मुकअ याचे दुर्लक्ष का ? असे असताना पुन्हां पंचायत राज समितीच्या चिमूर तालुक्यात होत असलेल्या दौऱ्यावर येत आहेत. हि समिती या प्रकरणात काय कार्यवाही करते या कडे लक्ष लागले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अतर्गत या योजनेत
नियमाचे उलंघन करून मनरेंगातील कामात गैरव्यव्हर या बाबीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद चंद्रपूर यांनी चिमुर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी बीडीओ व्ही.बी जाधव साह्ययक लेखापाल विशाल वासलवार यांचे सह चिचाळा शास्त्री चे तात्कालिन ग्रामसेवक चांदेकर , मदनापूरचे ग्रामसेवक झिले , पुयारदंड ,गडपिपरी चे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ ,खानगावचे तत्कालीन ग्रामसेवक दुर्गे मानेमोहाळी डि एम पेंदोर ,गदगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सचिन राऊत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्या अनुषणगाने तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे कळविले होते .
चिचाळा शास्त्री व मदनापूर हे दोन्ही गावातील अंतर 70 ते 80 किमी असून एकाच तारखेला एकाच वेळी एकाच वाहनाने 300 ते 350 ट्रिप रेती,मुरूम टाकणे शक्य नाही तरीही या दोन गावात मुरूम टाकल्याचे दाखविण्यात आले असून या मुरूम,रेतीची बोगस बिले,टिप्या जोडून नुकतेच देयके ग्रामपंचायती मार्फत उचलुन पुरवठादार ,ग्रामसेवक,सरपंच व यंत्रणतील अधिकारी यांनी रक्कम हडप केल्याची चर्चा गावात सुरु होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी चिमूर तालुक्यातील झालेल्या मनरेगा गैरप्रकारात चिमूर पंचायत समितीचे सहा.लेखाधिकारी विशाल वासलवार यांना ३०नोव्हेबर २०१७ पासून निलंबित करून नागभीड पंचयात समिती येथे मुख्यलायी हजार राहण्याचे आदेश निर्गमित केले होते. हा आदेश दिनांक ०९डिसेंबरला मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्याल्याने बजावला असला तरी दिनांक १५डिसेंबरला चिमूर पंचायत समितीत धडकताच प्रशासनात खळबळ उढाली होती आज ३-४ वर्षे होत असून अजुनही उर्वरित कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे चिमूर पंचायत समितीत आज पंचायत राज समिती दौऱ्यावर येणार असून या प्रकरणी समितीच्या समोर काय कार्यवाही होते याकडे लक्ष वेधले गेले आहे