मोरे कुटुंबांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ न्याय मिळवून देण्यासाठी नाभिकांचे निवेदन
मोरे कुटुंबांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ न्याय मिळवून देण्यासाठी नाभिकांचे निवेदन

दिनचर्या न्युज : उस्मानाबाद

महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई,शाखा-सोलापूर
यांच्या वतीने दिनांक 8 /2/ 2021 वार- सोमवार वेळ दुपारी 11-30 वाजता माननीय श्री. जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर यांना निवेदन देण्यात आले की,उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी या गावातील नाभिक समाजाचे आपले समाज बांधव श्री. विठ्ठल कुंडलिक मोरे व त्यांची मुलं श्री.लक्ष्मण मोरे व श्री.संकेत मोरे यांच्यावर गावातील समाजकंटक सापते कुटुंबीय व त्यांचे साथीदार यांच्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला व जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली अशा भ्याड हल्ल्याचा नाभिक समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात येत आहे. आपल्या नाभिक बांधावावर सलून व्यवसायिकावर होणाऱ्या वारंवार हल्ल्याची शासनाने दखल घ्यावी व सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी व आमच्या नाभिक बांधवाना संरक्षण मिळावे व न्याय मिळवून द्यावा ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी *महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष- माननीय श्री.वैभवजी शेटे(सर)व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवक अध्यक्ष- माननीय श्री.मनोजजी डिगे* तसेच *महाराष्ट्र नाभिक महामंडळ सोलापूर कोअर कमिटी-मा.श्री.संजयजी चिकले,मा.श्री.गणेशजी वाघमारे,मा.श्री.स्वप्निलजी रणदिवे,मा.श्री.सहदेवजी वाघमारे व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष- मा.श्री. पांडुरंगजी पवार, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष- मा.श्री आनंदजी वाघमारे*,व *सोलापूर शहर अध्यक्ष -मा.श्री.श्रीकांतजी राऊत,सोलापूर शहर युवक अध्यक्ष -मा.श्री.गणेशजी चौधरी, बारा बलुतेदार संघ सोलापूर शहर अध्यक्ष-मा.श्री. प्रकाशजी शिंदे,बारा बलुतेदार संघ सोलापूर शहर युवक अध्यक्ष -मा.श्री.मनेशजी गंजाळकर, कर्मचारी संघ सोलापूर शहर अध्यक्ष- मा.श्री.सुमीतजी गवळी,सोलापूर शहर महिला अध्यक्षा- जयश्रीजी पवार,कर्मचारी संघ सोलापूर शहर महिला अध्यक्षा- मा.सौ.राधिकाजी राऊत,मा.श्री.बाळासाहेब वाळके,महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई ,शाखा-सोलापुरचे शहर सचिव-मा.श्री.संदीपजी पवार* यांची प्रमुख उपस्थिती होती.