५५ दिवसाचा कालावधी संपला, मनपात स्थायी समिती सभापती पदासाठी लेटरबाँम्ब!






५५ दिवसा
चा कालावधी संपला, मनपात स्थायी समिती सभापती पदासाठी लेटरबाँम्ब!

भाजपामध्ये पुन्हा गृहकलह
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
५५ दिवसांपूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी विराजमान झालेले रवी आसवानी यांचा कार्यकाळ३१ मार्चला संपला असून, या पदासाठी १० एप्रिलपर्यंत निवडणूक घेण्यात यावी, असे पत्र भाजपचे गटनेते वसंत देशमुख यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना दोन दिवसांपूर्वीच दिले. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा मोठा गृहकलह सुरू झाल्याची चिन्हे यानिमित्ताने दिसू लागली आहे.
सन २०१७ मध्ये महानगरपालिकेची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली. भाजप मित्र पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले.
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा गटनेत्याचे आयुक्तांना पत्र मिळाले.
त्यामुळे नवीन सभापती निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, असे पत्र थेट भाजपच्या गटनेत्यानीच दिल्याने आयुक्त राजेश मोहितेसुद्धा हतबल झाले आहे. ३१ मार्चलाच देशमुखांनी आयुक्तांना पत्र दिले. आयुक्तांनी लगेच यावर कार्यवाही सुरू करण्यात यावी, असा शेरा मारत हे पत्र प्रशासन विभागाकडे दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात स्थायी समिती सभापती पदावरून भाजपमध्ये पुन्हा सुंदोपसुंदी होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक वर्षभरावर येवून ठेपली आहे.

सूत्रांच्या माहीतीनुसार असे ही समोर आले की , गटनेते म्हणून वसंत देशमुख यांनी मनपा आयुक्ताला पत्र दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वसंत देशमुख यांची भेट घेऊन मनधरणी केली होती पण त्यांना अपयश आल्याने भाजपचे सर्वेसर्वा असणारे सुधीर मुनगंटीवार यांना मध्यस्थी करावी लागली व मुनगंटीवार यांनी वसंत देशमुख यांना शर्तीचे प्रयत्न करून भेटीसाठी बोलावून घेतले .मुनगंटीवार यांनी जवळजवळ 1 तास वसंत देशमुख यांच्याशी चर्चा केली वा मनधरणी सुद्धा केली . पण वसंत देशमुख यांच्या प्रश्नांसमोर मुनगंटीवार हे सुद्धा निरुत्तर झाले होते .

यावरून हे स्पष्ट होते की , अशी कुठली गोम असेल की, म्हणून मुनगंटीवार सारखे दिग्गज नेते वसंत देशमुख सारख्या सर्वात वरीष्ठ तथा निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी घेत आहे. परंतू वास्तव लक्षात न घेता देशमुख यांची मनधरणी करण्याला पसंती देत आहेत .अर्थात हा पक्षाचा अंतर्गत विषय असू शकतो. मात्र देशमुख काही मुनगंटीवार यांना जुमाननार असं दिसत नाही. .त्यामुळे येणारी वेळ चुरशीची असेल हे मात्र निश्चित .
 देशमुखांनी पक्ष | सोडलेला नाही. पण, महानगरपालिकेत त्यांनी आपली वेगळी चूल तयार केली आहे.
नियमानुसार रवी आसवानी यांना फक्त ५५ दिवसच मिळाले. त्यांचा कार्यकाळ ३१ मार्चला संपुष्टात आला.
स्थायी समितीतून आठ सदस्य निवृत्त होणार
एकूण १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीमधून आठ सदस्यांचा कार्यकाळ ३१ मार्चला संपला आहे. यामध्ये स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संजय कंचलावार, सुभाष कासनगोट्टवार यांचाही समावेश आहे, नवीन सदस्यांची नावे पाठवितानाही सत्तारूढ आणि विरोधी पक्षाला कसरत करावी लागणार आहे.
सत्ता असताना शुध्दा भाजपमध्ये मोठा अंतर्गत कलह सुरू झाला आहे. देशमुख यांच्या या 'लेटरबॉम्ब' नंतर भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, सभापतीपदाच्या निवडणुकीत देशमुख नेमकी काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी देशमुख यांच्यासोबत किती नगरसेवक आहेत आणि काय परिणाम होवू शकतात याचीही चाचपणी पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.