सलून व्यावसायिकांचे आत्महत्या सत्र सुरूच, निर्दयी सरकारची अजूनही मदत नाही!
सलून व्यावसायिकांचे आत्महत्या सत्र सुरूच, निर्दयी सरकारची अजूनही मदत नाही!


कर्जबाजारी सलून व्यवसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या

दिनचर्या न्युज :-

पाचोरा :-

सलून व्यावसायिकांचे आत्महत्या सत्र सुरूच असून निर्दयी सरकारची अजूनही मदत नाही!राज्यात सर्वाधिक पटका हा नाभिक सलून व्यवसाय करणाऱ्यांना बसला. राज्यात आत्महत्या आतापर्यंत 30वर झाल्या आहेत. तरीही या तिघाडी सरकारची कवडीचीही मदत सलून व्यवसायकाना

मिळाली नाही.

कर्जबाजारीला कंटाळून जळगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील एका सलून व्यवसायीकाने त्याच्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील माळपिंप्री या गावातील गजानन कडू वाघ (वय ३५) हे आपल्या व्यवसाया निमित्ताने जळगाव येथील लक्ष्मी नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पत्नी सरला (३०) व मुलगी वैष्णवी (१२) व मुलगा ऋषिकेश (९) यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते.व मिळेल त्या कटींग सलून दुकानावर काम मिळेल त्या दुकानावर रोजंदारीवर काम करुन आपला प्रपंच चालवत होते.अश्यातच मागील एक वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे नाभिक बांधवाचा व्यवसाय बंद असल्याने यात गजानन वाघ यांचे रोजंदारीवर चालणारे सलूनचे काम ही बंद झाल्याने. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काय करावे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला होता. सुरवातीला भविष्यात आपला व्यवसाय पून्हा सुरु होईल अशी आशा उराशी बाळगून गजानन वाघ यांनी आपल्या ओळखीच्या कटींग सलून मालकांकडून परतफेडीची बोली करत वराचसा उचल उचलला होता. परंतु अजूनही लॉकडाऊन सुरुच असल्याने पुन्हा, पुन्हा हात उसनवारी करणे शक्य नव्हते तरीही गजानन वाघ हा सुस्वभावी व चांगला कारागीर असल्याने ओळखीच्या नाभिक व्यवसाय करणाऱ्या दुकानदार गजानन यास थोडीफार मदत करत होते. याच आधारावर जेमतेम दोन घास खाऊन संसाराचा गाडा चालत होता.मात्र संसाराचा गाडा ओढतांना घरातील अनेक अडचणींना सामोरे जात, जात गजानन मेटाकुटीला आला होता. कारण घरची परिस्थिती नाजूक स्वतःची शेती नाही. शेतात दुसरीकडे रोजंदारीवर कामाला जाऊन दोन पैसे कमावण्यासाठी जाव परंतु शेतीकामांचा अनुभव नसल्याने हातावर हात ठेवून बसल्याशिवाय पर्याय नव्हता.परिस्तितीला कंटाळून गजानन हताश झाला पोटची मुल चॉकलेट मागायची परंतु आपल्या मुलांना चॉकलेट घेऊन देण्याइतपत परिस्थिती नसल्याने गजानन वाघ हतबल झाला पत्नी व मुलांची दररोजची मरमर सहन न झाल्याने गजानन याने मध्यरात्री राहत्या घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज दिनांक ०४ जुलै रविवारी सकाळी उघडकीस आली.ही घटना माहीत पडताच गजाननचा भाऊ ईश्वर वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत गजाननला खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महारुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी मृत घोषित केले.शवविच्छेदन करून मुतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत गजानन च्या पश्चात आई लताबाई, रामेश्वर आणि ईश्वर असे दोन भाऊ, पत्नी सरला, मुलगी वैष्णवी व मुलगा ऋषिकेश असा परिवार आहे.या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहरातील नाभिक समाजबांधवांनी एकत्र येत सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत गजानन वाघ यांच्या परिवारातील सदस्यांचे सात्वन करत मदतीचा हात पुढे केला.

(सततच्या लॉकडाऊमुळे कटींग सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाबांधवांना आपले कुटुंब कसे चालवावे असा बिकट प्रश्न पडला असून शासनदरबारी दखल घेत यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी वारंवार केली जात आहे.)